या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. सरकारचा ह्यांच्यावर अंमल आहे. मोंगोलियन जातीचे अनेक भेद आहेत, त्यांपैकीच हाही एक भेद होय. याकुत देशाचे दोन निरनिराळे भाग आहेत. त्याच्या दक्षिणेस मोठमोठाले पर्वत आहेत. पश्चिमेस व उत्तरेस मोठमोठाली मैदाने असून त्यांत लहान लहान झुडुपें दाटलेली आहेत. मधूनमधून मोठमोठाल्या अनेक नद्या व ओढे वहात असतात. त्यांतून पार जाण्यासाठी तिकडील लोक, झाडांच्या सालींच्या व लांकडाच्या लहान लहान होड्या तयार करतात. त्या होड्या इतक्या लहान असतात की, त्यांत दोन किंवा तीन मनुष्ये बसली झणजे फार झाले. रेनदीर ह्मणून एक हरणाची किंवा सांबराची जात आहे. तें याकुत लोकांचे फार उपयोगी जनावर. ह्या देशांतील थंडी फार कडक असते. सैबेरियांतील कोणत्याही प्रांतापेक्षां येथील थंडीचा अंमल विशेष असतो. याकुत लोकांची वस्ती २००००० पेक्षा अधिक नाहीं. याकुत लोकांची उंची साधारणच असते. तरी ते मोठे मजबूत व हाडकाठीने बळकट असतात. त्यांची छाती पसरट असून नाक फेंफाणे असते. डोळे काळे व घारे दोन्हीही प्रकारचे असतात. त्यांच्या आंगाचा वर्ण साधारणपणे गोरा व काळा ह्यांच्या मधोमध असून त्यांत एक विशेष चमत्कार आहे. तो हा की, तो रंग वर्षातून तीन वेळ किंवा चार वेळ बदलतो. पर्जन्यकालांतील वातावरणानें तो तांबडसर होतो उन्हाळ्यांतील उन्हानें तो काळसर होतो; आणि हिवाळ्यांतील थंडीने आणि त्यांच्या आगट्यांनी त्याच्यावर पिवळी झांक मारते! याकुत लोकांच्या आंगीं शिपाईबाणा नाही. कारण, त्यांचा शांत स्वभाव त्यास यद्धापासून नेहमीं परावृत्त करित असतो. तरी ते मोठ चपळ, माळू. व बुद्धिमान् असे असतात. त्यांच्याकडे कोणीही पाहुणा की अतिथी जावो, त्याचा ते उत्तम रीतीने आदरसत्कार करतात. तो आठवडाभर राहा का माहनाभर राहो, त्यास व त्याच्या घोड्यासही ते कांहीपन कमी पडू देत नाहीत. उलट अधिक आदराने देतात. ते दारूचे आणि तंबाखूचे मोठे भक्त आहेत. उपास काढण्याच्या कामांत त्यांच्यासारखे दुसरे लोक आढळावयाचे नाहीत. तीनतीन दिवस किंवा चारचार दिवस अन्नपाण्यावांचून काम करणे ह्यांत त्यांना कांहींच क्षिति