या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. ठेवली, आणि तो बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने प्रोटेजीनस बाहेरून घरी आला, तेव्हां घरांतील मनुष्यांनी त्यास सांगितले की, आपणाकडे कोणी एक गृहस्थ भेटण्यासाठी आला होता. परंतु त्याने आपले नांव सांगितले नाही, किंवा लिहूनही ठेवले नाही. पण ह्या कापडावर एक रेषा मात्र काढून ठेवली आहे. प्रोटेजीनसने जेव्हां त्या रेषेकडे पाहिले, तेव्हां तिच्या त्या सफाईवरून व सौंदर्यावरून त्याची खात्री झाली की, ही रेषा अपेलसाशिवाय इतर कोणाची काढण्याची मगदूर नाही. हे जाणून त्यानेही एक कलम घेतले आणि तिच्यावर पहिल्या रेषेहून निराळ्या रंगाची रेषा, काढून ठेवली. तीही इतकी सुंदर होती की, पहिलीहून कांकणभर सरसच. इतके करून तो पुन्हा बाहेर निघून गेला. आणि जातांना घरामध्ये आपल्या बायकोस त्याने सांगून ठेवले की, तो पूर्वीचा गृहस्थ पुन्हा आल्यास त्याला ही रेषा दाखीव. प्रोटेजीनसास जाऊन थोडा वेळ झाला नाही तोच अपेलसही पुन्हा आला. आणि त्याने त्या दुसरा रेषेच्यावर तिसरी एक रेषा काढून ठेविली. ही रेषा इतकी म होती की, तिच्यावर कडी करणें निखालस दुरापास्तच होते. प्रोटेजीनसाने परत येऊन पाहिले तो आपल्या प्रियमित्राने आपणावरही ताण केली आहे खरी, आणि तिच्यावर कडी करण्याला आपल्यापाशी कांहीं साधन राहिले नाही, अशी त्याची खात्री झाली. थोडा वेळ गेल्यावर त्याचा तो आवडता मित्रही येऊन त्यास भेटला. तेव्हां त्या परस्परांस आनदांची किती उकळी आली असेल, हे सांगणे नकोच. ते एकमेकांस फारच प्रेमाने भेटले. त्या तीन रेषा काढलेला तो कापडाचा तुकडा फार जपून ठेवला होता. आणि त्यांतील कौशल्याचे पिढ्यान्पिढ्या आश्चर्य मानित आल्या होत्या. नंतर त्या रेषा रोममध्ये आणून सीझरच्या राजवाड्यांत टांगून ठेवण्यांत आल्या. तेव्हां जे जे कोणा राजवाडा पहावयास येत, ते ते येवढ्या मोठ्या कापडावर फक्त तीनच रेषा पाहन आश्चर्य करीत. पण त्या तीन रेषाच इतक्या अप्रतिम होत्या की, त्या इतर ठिकाणी दृष्टीस पडण्याची सुद्धां मारामार. सरः तेशेवटी त्या राजवाड्यास मोठी आग लागून त्याची जेव्हा राखरा गोळी उडाली, तेव्हां त्या रेषांसही जग मुकलें!