या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २९९ स्फुट व मनोरंजक माहिती. Flage १ निरनिराळ्या पक्ष्यांचे आयुर्दाय. पृथ्वीवर जे पक्षी आहेत, त्या सर्वांत गरुड, राजहंस व डोमकावळा हे पक्षी पुष्कळ वर्षे वांचतात. कधी कधी तर ते १०० रांहूनही अधिक वर्षे वांचल्याचे दाखले आलेले आहेत. करकोचा, पोपट, हंस, इत्यादि पक्ष्यांचा आयुर्दाय ६० वर्षांचा असतो. मोर २० वर्षेपर्यंत जगतो. कबूतर व कावळा २५ वर्षे तुर्की मोर १५ वर्षे; भारद्वाज १३ वर्षे; आणि मदनसारिका १० वर्षेपर्यंत वांचते. इतर, रेन, पेलिकन-(ह्यास 'पानकोळी' असें ह्मणतात.), लिनेट, क्यानरी, गोल्डफिंच, ब्ल्याक्वर्ड, रेडब्रेस्ट रॉबिन् वगैरे जे अन्यदेशींचे पक्षी आहेत, त्यांचे आयुर्मान येणेप्रमाणे:-रेन (ठोकळकालमानानें ) ३ वर्षे; पेलिकन् , ६० वर्षे; लिनेट, २० वर्षे; क्यानरी, २४ वर्षे; गोल्डफिंच, १५ वर्षे ब्ल्याबर्ड व रेड्ब्रेस्ट रॉबिन् यांचे १२ वर असते. २ कोळी, हे हवामान ओळखण्याचे साधन आहे. पाश्चात्य देशांतील एक महान् शोधक व दीर्घोद्योगी माळी अनुभव घेऊन सांगतो की, कोळी, हे हवामान ताडण्याचे एक मोठे जबरें साधन आहे. त्या माळ्याचें असें झणणे आहे की, तांबडे कोळी झाडांवर दिसू लागले हणजे लोकांनी ठाम समजावें, की, हे हवा अगदी कोरडी होण्याचे चिन्ह आहे. आणि असे चिन्ह होणे, हे झाडाझुडांस मोठे बाधक होय. ह्याकरितां अशा समयास हे संकट टाळण्यासाठी, झाडांस प्रत्येक दिवशी पाणी देत जावें. बागबगीचे करणारांनी ह्या गोष्टीचा अनुभव पहावा. या का ३ एक महान् बलशाली बादशहा. शरीरकाठी मजबूत असणे फार चांगले. कारण, शरीराची मजबुती हा आरोग्याचा पाया आहे. शरीर चांगले खबरदार असले झणजे मनुष्याला मोठा उत्साह असतो. त्यास कोणतीही गोष्ट-बुद्धिवर्धक ह्मणा, किंवा शक्तिवक झणा करण्याची मोठी उमेद वाटते. काबाडकष्ट करणारांची शरीरकाठी बाधा मजबत असते. परंतु साधारण लोकांपेक्षां श्रीमंत लोकांत शरीर बळकट असणे. फार हितावह होय. राजेलोक बहुधा बरेच सशक्त असतात आणि सशक्त असलेलेच चांगले ! प्राचीनकाळी अशी चाल असे की, राजा अशक्त