या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. शिवाय इतरांस बहुधा भरतां येत नाही. ह्याला-ह्मणजे ही कोष्टकें भरण्याला कांही रीत आहे, असें कोणाकडूनही आमच्या ऐकण्यांत आले नाही. व ह्याला काही तरी रीत काढावी अशा उद्देशाने आह्मी व कांहीं मित्रमंडळी उद्योगास लागलों व त्यांत आझांस थोडें बहुत यश आले आहे. ते कोकिळच्या वाचकांस मजेदार वाटेल ह्मणून देतो. कित्येकांस हा विषय अगदी पोरकट आहे असें सकृदर्शनी वाटेल. पण तितका कांहीं तो पोरकट नाही, असें विचारांती आढळून येईल. आतां कोष्टक झणजे काय हे सांगावयास नकोच. तथापि सोबतच्या आकृतींत दिल्याप्रमाणे एकंदर १६ घरांचे किंवा एकेका ओळींत ४ घरे ह्या प्रमाणे एक कोष्टक आहे. तें असें भरावयाचें की त्यांतील प्रत्येक ओळींतील आंकड्यांची बेरीज सारखी भरावी. व तोच आंकडा पुनः येऊ नये. आतां अशा त-हेच्या कोष्टकांचे दोन वर्ग करितां येतील. एक ज्यांत घरांची संख्या सम आहे. व दुसरा असा की ज्यांत घरांची संख्या विषम आहे. विषम घरांची कोष्टके भरावयाचे फारच सोपे आहे. मागन तशीच कोष्टके प्रथम घेऊ या व मग समघरांची घेऊ. उदाहरणार्थ आपल्स एक २५ घरांचे कोष्टक भरावयाचे आहे, असे समजूं, तर ह्या कोष्टकाच्या का वरच्या ओळींतील बरोबर मधल्या ह्मणजे तिसऱ्या घरांत १ मांडावा. व 'अब' ह्या तिरव्या रेषेनें वर मांडीत चाललो आहों अशी कल्पना करूं या. परंतु ती रेघ कोष्टकाच्या बाहेर जाते. तेथे घर नाही. तर असें जेव्हां घर नसेल त्या वेळेस 'कडब' झणजे 'अबम' घर समुदायापुढील घरांच्या ओळींतील शेवटले 'मकवह' ह्यांत २ टाकावे. ते टाकिल्यावर आपण तिरव्या रेषेनें ('मव' हिने) वर जातो आहों में विसरता कामा नये. तेव्हां मांडलेल्या स्थानी ३ आले. आतां ३ च्या पुढे तिरवें घर नाही. ह्मणून पुढच्या घरांच्या ओळींतील समोरच्या बाजूस ४ मांडले. व पुढे ओळीनेच तिरव्या कोष्टकांत ५ मांडले. परंतु पांचांच्या पुढील तिरवें घर आधीच भरलेले आहे. असें ज्या वेळी पुढील घर भरलेले असेल यावेळी पुढील आंकडा मूळच्या आंकड्याच्या समोरच खालून जवळच्या घरांत मांडावा ह्मणजे खालील आकृतींत दिल्याप्रमाणे मांडल्यावर .