या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. [अं० १२ लोकोत्तर चमत्कार. दोन फणांचा नाग. VAIDYA पुराणांतरी वर्णन केलेल्या गोष्टी, कित्येक बाबतींत निखालस खोट्या असतात, असे निदान कांहीं कालपर्यंत तरी आपल्या मनांत येते. रावणास दहा तोंडें व वीस हात होते. सहस्रार्जुनाला एक हजार हात होते. दत्तात्रेयाला तीन तोंडे व सहा हात होते, किंवा आहेत. ब्रह्मदेवाला चार तोंडें; इत्यादि वर्णने आपल्या कानावर येतात तेव्हां, आपण संशयसागरांत बुडून जातो. इतकेंच नव्हे, तर कधी कधी हे लिहिणारे लेखक केवळ खोटसाळ असावेत-गप्पीदास असावेतअसाही मनाचा ग्रह झाल्यावांचून राहत नाही. परंतु केरळकोकिळांत पूर्वी येऊन गेल्याप्रमाणे 'जुळ्या मुली' 'जुळे मुलगे' असली संतति जेव्हां हल्लींच्या मन्वंतरांत सुद्धा आपल्या डोळ्यांपुढे येते, तेव्हां पुन्हा तो आपला पुराणांस 'झूट' ह्मणण्याचा विचार चुकीचाच दिसतो. अशी ही आपल्या मनांत कल्पना उद्भवते. शेषाला एकाला एक हजार णा आहेत, असेंही आपण ऐकतों व वाचतो. ह्याचा अर्थ काय ? पर्वी हजार हजार फणांचे नाग होते असें मानिले, तर आतां दोन