या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १९०१. किंवा फॉसिल ( पाषाणरूप बनलेले देह) सांप्रतकाळी भूगर्भशास्त्रदृष्टया पृथ्वीच्या पोटांत कोठे आढळावेत किंवा नाहीत? ते कां आढळत नाहीत? असा एक प्रश्न उद्भवतो, व त्याचे उत्तर नीटसे समाधानकारक देताही येत नाही, खरेंच. तथापि पूर्वयुगांतरीं असले प्राणी होते खरे, पण ते फारसे नव्हते, हीही एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. तेव्हां जे प्राणी मुळी जगावर क्वचित्, त्यांचे सांगाडे मिळणेही दुर्लभ असणे स्वाभाविकच आहे. कसेंही असो, असे अनेक अवयवांचे प्राणी जगावर उत्पन्न होतात, ही गोष्ट इतिहासांत नमुद करण्यासारखी आहे. आतां अशी सृष्टि कशापासून होते? त्यांची आईबापें एकएक अवयवी धडधडीत दिसत असतां, त्यांच्या अपत्यालाच अशा विचित्र शाखा कशा व कां फुटतात ? हा प्रश्न गहन शास्त्राचा आहे. तो प्रस्तुत कालाच्या बुद्धिमत्तेत तरी सुटलेला नाही हे खास. पण कालांतरानें कदाचित् सुटेलही. नाहीं कशी ह्मणावें? तूर्त अशा विचित्र सृष्टि किंवा जीव पाहून आपण आश्चर्यचकित व्हावें, मनांत संतोष मानावा, आणि अनंताच्या अनंत सामथ्योची कल्पना मनांत वागवून त्याच्या चरणापाशीं सदा लीन असावें, येवढेच आपले कर्तव्य आहे. के केरळकोकिळचे आश्रयदाते व अभिमानी श्री. रा. रा. विष्णु केशवशेट सांपळे. ह्यांचा अखंड वियोग!!! जगांतील झाडून सारी कार्ये, यच्चयावत् घडामोडी, निरनिराळी उ. त्पन्न होणारी सुखदुःखें, लाभ व हानी; मान व अपमान; घडवून आणणारी एकच द्विधा शक्ति किंवा जुगल आहे. आणि ती कोण तर संयोग आणि वियोग. पण हिच्यामध्ये हा एक विशेष चमत्कार आहे की, तिच्यांतील एका अंगामुळे नेहेमी निश्चयात्मक एकच कार्य होते, असे मात्र घडत नाही. तर तिच्या एकाच कार्याने कधी ला