या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ व. . होतो, कधी हानी होते; कधीं सुख होते कधी दुःख होते. आणखी तेंही परस्परांच्या संबंधाप्रमाणे उलट किंवा सुलट होते. शिवाय, हे विकार कालावधीच्या मानावरही कमजास्ती प्रमाणाने अवलंबून राहतात. जन्म व मृत्यु ही अशापैकीच एक जुगल आहे. ही दोन्ही सुखकर आहेत की दुःखकर आहेत, ह्याचा निर्णय करावयास गेले तर, तो वि. षय अत्यंत खोल व गहन आहे. त्याचा ऊहापोह करित बसण्याचे हे स्थळ नव्हे. तथापि त्यांतल्या त्यांत स्वजन, सजन, उदार, रासक, व उद्योगशील मनुष्यांचा मृत्यु मटला की, तो असह्य, दुःखदायक, महाहानिकारक, असल्याचे सर्वसंमत आहे. कारण, की तो अखंडचा वियोग असल्यामुळे, त्याच्या संयोगापासून प्राप्त व उपलब्ध असलेली यच्चयावत् सुखें एकदम लयास जातात. तेव्हां त्याबद्दल काळजास घरा पडावा, हे मनुष्यखभावास अनुसरूनच आहे. श्री० रा. रा. विष्णु केशवशेट सांपळे, हे कोचीतील महाराष्ट्रमंडळीत एक प्रमुख गृहस्थ होते. ते केरळकोकिळाचे आश्रयदाते, र. स्कर्ते, अभिमानी, व चहाते असत. कोकिळाच्या बाल्यदर्शत-परंग, रया का होईना-पण त्यांचा त्यास आधारस्तंभ होता. ते मोठे रसिक, उदार व सजनांचे चहाते होते. ते केवळ स्वपराक्रमाने नांव, कीर्ति. व द्रव्य संपादन करून कोचीमध्ये नामांकित व्यापारी बनले. तेव्हा अशांच्या निधनवार्तेची ता० २३ नोवेंबर रोजी अकस्मात् कोकिळास तार आल्यावर त्यास दुःख व्हावें, त्याची चित्तवृत्ति तटस्थ व्हावा, ह स्वाभाविकच आहे. तथापि हा बोलन चालून मृत्युलोकच आहे, हा विचार मनांत आणून तोही लोकाचाराप्रमाणे दुनियादारीकड वळला आहे, व शोकाकुल अंतःकरणाने त्यांचे अल्पसें माहित असलेले चरित्र, आपले कर्तव्य असे समजून तो आपल्या वांचकांस सादर करीत आहे. तेव्हां अर्थातच त्यांच्या संबंधाने ज्यांस ह्याहून कमजास्ती माहिती असेल, त्यांनी ' चूकभूल द्यावी घ्यावी' ह्या न्यायास अनुसरणें उचित होय. माण रत्नागिरीजिल्ह्यांतील राजापूर बंदर हे सांपळ्याच्या घराण्याचे मूळ ठिकाण होय. तेथे ह्यांचे पूर्वज फारच मोठे नामांकित व्यापारी होते। सांपळे हे जातीचे वैश्य होत. द्वीपांतरास जाणारे मोठमोठे कोठिये,