या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

CCC२ .C अंक ४ थी. एप्रिल १८९८. ७५ वाटत नाही. त्यांचे लांब आणि काळेभोर केस स्वाभाविकपणेच त्यांच्या मस्तकाभोंवतीं उडत असतात. पण तोंडावर बहुतकरून मुळींच केंस नसतात मटले तरी चालेल. ते आपल्या केसांतील एक बट भली लांब राखतात; आणि त्यांचे धनुष्य जेव्हां सुकें राखावयाचे असेल तेव्हां तें त्या बटेस बांधून ठेवून, प्रवासांत किंवा शिकारीला वगैरे जातांना केवढीही मोठी नदी मध्ये येवो, तींतून ते पोहून पार होतात. ह्यांचा देश इतका विस्तृत आहे की, त्यांतील निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या हवा असून त्यांच्यांत फार मोठी तफावत असते. उदाहरणार्थ, अल्कर्मिक येथे गहूं उत्तम पिकतात. कारण, तेथें पांढरें दंव पडते, ते फार उशीराने पडते. आणि उलट पक्षी डिगान्स येथे नेहमी दोन हात खोलीपर्यंत जमीन थिजलेली असते; आणि तेथे आगस्ट महिन्यांतच बर्फ पडण्यास प्रारंभ होतो. अर्थात् तेथील जमीन केवळ निरुपयोगी होय. याकुत लोकांपैकी बहुतेक लोक बाप्तिस्मा घेऊन रशियन धर्मात गेले आहेत. नाहीत असे २०० सांपडण्याची सुद्धा मारामार पडेल. ते धर्माध्यक्षांची आज्ञा पाळतात. देवळामध्ये प्रार्थनेस जातात; परंतु धर्मविधींचे फारसें बंड माजवीत नाहीत. जितके होतील तितके थोडे विधि करण्याचा त्यांचा प्रघात असतो. देवाचे स्मरण केल्याशिवाय ते लोक कधी घराबाहेर पडावयाचे नाहीत, किंवा निजावयास जावयाचे नाहीत. कोणतीही गोष्ट घडो, ते लागलीच परमेश्वराची प्रार्थना करतात. एखाद्यावर दुर्दैवाचा घाला येऊन पडला, तर आपल्यास घडलेल्या पातकाची परमेश्वराने शिक्षा केली असे समजून धैर्य न सोडतां परमेश्वर कृपा करील तर पुन्हाही चांगले दिवस येतील अशी आशा धरून बसतात. भूताखेतांना सुद्धां नमस्कार घालण्यामध्ये त्यांची विलक्षण श्रद्धा दिसून येते. मोठे दुखणे बाणे आले तर ते लोक नवस करतात, व विवक्षित रंगाचा पशु बळी देतात. याकुत लोक घरांतील वडील माणसांस अतिशय मान देतात; त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागतात; आणि चांगले कोणते आणि वाईट कोणतें ह्याचा नीटपणे विचार करतात. एखाद्याला अधिक मुलें असली, तर तो त्यांची एकामागून एक लग्ने करून देतो; निरनिराळी घरे बांधून देतो; व