या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १९०१. २७१ गृहस्थ आहेत, ते त्यांचेच वंशज, व विष्णुशेटीचे चुलत बंधु होत. वैश्य लोकांत, आणि त्यांतही व्यापारी मटले की, त्यांचे विद्येचे मान फारसे पुढे नसते. इतकेच नव्हे, तर विष्णुशेट हे बरेच शिकलेले होते तरीसुद्धां, आमची व त्यांची गांठ पडेपर्यंत त्यांस 'श', 'ष', व 'स' ह्यांच्यामधील भेद कळत नव्हता! व तो आमी त्यांस सांगितल्यानंतर त्यांस फार आश्चर्य वाटले, व त्याबद्दल ते वारंवार आठवण काढीत. परंतु गोविंद मोतिराम हे चांगले सुशिक्षित, बहुश्रुत, वक्ते, लेखक व रसिक असे असून सांप्रत ते राजापूरच्या म्युनिसिपालिटीचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. ह्यांनाही विष्णुरोटींनी कोचीस बोलावून नेऊन बरेच दिवस ठेऊन घेतले होते, व काही त्यांच्या नांवाने व्यापार काढावा असाही त्यांचा मनोदय होता. पण अनेक कारणांनी ते कार्य सिद्धीस गेलें नाहीं. विष्णुशेटींचा जन्म शके १७६५ श्रावण शुक्ल ११ रविवारी शोभननाम संवत्सरांत झाला. त्यांच्या अगदी लहानपणी एक अद्भुत घडलेली गोष्ट फारच ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ती अशी:सावंतवाडीशेजारी ओटवणे ह्मणून एक लहानसे गांव आहे, व तेथे एक जागृत दैवत आहे. त्या गांवीं एकदा आपल्या मुलांस बरोबर घेऊन विष्णुशेटींच्या मातुश्री गेल्या होत्या. विष्णुरोट त्या वेळी अवघे सहा महिन्यांचे होते. तेथे एकदा त्यांच्या मातुश्री धुणी धुण्याकरितां नदीवर गेल्या. व या लहान मुलास-ह्मणजे विष्णुशेटीस एका झाडाच्या सावलीत दुपट्यावर ठेवून आपली धुणी धुऊ लागल्या-धुण्यांत गुंतल्यामुळे मुलाकडे थोडेसें दुर्लक्ष्य झाले. थोड्या वेळाने त्यांचे धुणे आटोपलें, आणि वर येऊन मुलाकडे पहातात तों तेथें मूल नाहीं ! जवळपास पाहिले तर, मनुष्यही कोठे दिसेना! तेव्हां त्या फारच बुचकळ्यांत पडल्या ! पोटच्या गोळ्याचे दुःख फार कठीण आहे. शेवटी केविलवाण्या तोंडाने हिकडे तिकडे पाहतांना झाडावर त्यांची नजर गेली. तो एका मोठ्या वानरीने तें मूल आपल्या पिलाप्रमाणेच पोटाशी घेऊन बसली आहे ! आणि ती कोठे ? तर एका मोठ्या उंच वृक्षाच्या शेंड्याहर! तेव्हां भीतीने त्या माउलीचें देहभान उडालें असेल हे सांगणे कोच. त्यांनी ओरडाओरड केली. तेव्हां कांहीं मनुष्ये धांऊन आली, आणि पहातात तों, हा चमत्कारिक प्रकार ! पण त्या मनुष्यांत एक