या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. फार चाणाक्ष मनुष्य होता. त्याने अशी कल्पना काढली की, येथे कोणी एक मनुष्य उभे राहूं नका, व ओरडाओरड करूं नका. नाहीं तर ती वानरीण ते मूल खाली टाकून देईल. असें ह्मणून त्याने सवीस लांब नेले, आणि विष्णुशेटीची आई व तो, मिळून दोघे त्या वानरीला न दिसेशी एका झाडाच्या अडोशाला छपून राहिली. ह्याला थोडा वेळ लोटला नाही, तोच वानरिणीस वाटले की, आतां येथे मनुष्य वगैरे कोणी नाही. तेव्हा तिने मुकाट्याने खाली येऊन पहिल्याप्रमाणे अल्लाद आणून त्या तान्ह्या मुलाला अर्थात् विष्णुशेटीला-दुपट्यावर पूर्ववत् निजविले आणि आपण पुन्हा झाडावर निघून गेली ! मग त्या माउलीचा आनंद काय विचारावा ? गगनांत मावेना. अशा प्रकारे अगदी लहानपणांत विष्णुशेटींचा अशा चमत्कारिक रीतीने एक पुनर्जन्मच झाला होता मटले तरी चालेल. 5 केशवशेट निवर्तले तेव्हां जगन्नाथशेट, तुकारामशेट, विष्णुशेट व पुरुषोत्तमशेट, असे चौघे त्यांचे मुलगे त्यांच्या मागे होते. तेव्हां या सर्वांचा भार, एकट्या मातुश्रीवर पडला हे उघडच आहे. त्यांच्या मातुश्री ह्या महान् साध्वी, व परमभक्तिमान् अशा होत्या. आणखी, जवळ काही विशेष नव्हते तरी, त्या अत्यंत उदार असत. त्या नित्य देव देव करीत, व प्रत्यही दोन दोन घटका ध्यानस्थ बसत; त्या भक्तिभावाने देवाची पूजा अर्चा करीत. आणि त्यांच्या मुखातून निघालेली गोष्ट खरी होत असे, अशाबद्दल त्यांची मोठी प्रसिद्धि होती. ह्या सर्व भावंडांत जगन्नाथशेट हे वडील होते. पण ते चांगले १८।२० वर्षांच्या वयाचे होईपर्यंत त्यांच्या मागे दुःसह व्याधीचें असें कांहीं शुक्लकाष्ट लागले होते की, कांहीं पुसूं नये. लहानपणी अतिशय काजू खाल्ल्यामुळे त्यांच्या सर्वांगावर इतका कांहीं व्रण फुटला होता की, पायापासून तो मस्तकापर्यंत त्यांस कितीतरी क्षतें पडून ती सारखी वाहत असत. त्यांचे भयंकर वण अद्यापही त्यांच्या आंगावर दिसतात. इतकेच नव्हे, तर ते वण पाहिले ह्मणजे त्यांतून हे निभावले कसे, ह्याचे आश्चर्य वाटते. हजारों औषधोपचार केले, तरी त्यांस गुण ह्मणून कसला तो पडतच नव्हता. आठ दहा वर्षे त्यांची त्याच विपद्रस्त स्थितींत गेली. शेवटी एका यःकश्चित् झाडपाल्याची