या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. नुष्य जसें केवळ दृश्य असून वस्तुतः काही नाही तद्वत् अष्टधाप्रकृति दृश्य होत असतां वास्तविक ती नाही ह्मणजे नाशिवंत आहे. rine शिक पणतू तोंडें भक्षितो पणजा ॥ मूल बापासि भारी ओजा EMEET चुकाया गेला राजा ॥ चवघा जणांचा ॥२॥ i-SERPFनिर्गुण ब्रह्मापासून आकाश उत्पन्न झालें, आकाशापासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून जल व जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली. आतां अनुक्रमें त्यांचेच प्रमाणाधिक्य करून, कैवल्य ज्ञानदेह, (आकाश-शून्य-खंब्रह्मेति श्रुतिः) वायूचा महाकारणदेह, तेजाचा कारणदेह, जलाचा सूक्ष्मदेह व पृथ्वीचा स्थूलदेह (दृश्य शरीर ) झाले आहेत; स्थूल देह पणतू व वायु हा महाकारण देह झणजे पणजा, ह्यावरून स्थूल देहमुखाने श्वसनक्रियेत वायूस भक्षण करतो. चौघाजणांचा (चारी देहांचा) राजा (आत्मा) चुकला झणजे आपण कोण हे विसरला. देव देवालयामध्ये लपाला ॥ देऊळ पूजितां पावे त्याला | PTS सृष्टीमध्ये ज्याला त्याला ॥ ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ श्लोक. देहो देवालयं प्रोक्तो देही देवो निरंजनः ॥ शंकराचार्य ( सदाचार ). अभंग. "देह हे देऊळ आत्मा हा विठ्ठल" (तुकाराम ). शरीर हे देऊळ आणि आत्मा हा देव होय व देवळास (शरीरास) जे जे पदार्थ द्यावे त्यांचा त्यांचा परिणाम आत्म्यास होतो अशीच स्थिति जगांत सर्वत्र आहे. दोन्ही नांवें एकास पडलीं ॥ लोकी नेमस्त कल्पिली ॥ सन विवेकें प्रत्ययें पाहिलीं ॥ तो एकची नाम ॥४॥ देव व देऊळ झणजे आत्मा व शरीर ही एकच, झणजे शरीर हाच मी अशी दोन्ही नांवें एका शरिरासच लोकांनी निश्चित केली, परंतु विचार करून व अनुभवाने पाहूं जातां शरीर हे नाशिवंत आहे, तेव्हां अविनाशी आत्मा हेच एक खरें नांव आहे. नाही पुरुष ना वनिता ॥ लोकी कल्पिलें तत्वतां ॥ याचा बरा शोध घेतां ॥ काहीच नाहीं ॥ ५ ॥ वास्तविक पाहिले झणजे, मी (आत्मा) व शरीर भिन्न आहे. जसें वाडा व