या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १९०१. २७६ त्यांत राहणारा हे भिन्न आहेत त्याप्रमाणे, तेव्हां स्त्रीत्व किंवा पुंस्त्व हा भेद शरीरास आहे; आत्म्यास नाही. परंतु शरीर हणजेच मी ह्या भ्रामक कल्पनेनेच मी पुरुष आहे, मी स्त्री आहे असे समजतात. हे पुढे उदाहरणाने स्पष्ट केले. स्त्री नदी पुरुष खळाळ ॥ ऐसें बोलती सकळ ॥ UP HPPT विवरोनी पाहतां निवळ ॥ देह नाहीं ॥६॥ नदीचे अंगीं स्त्रीत्व व खळाळांस पुंस्त्व समजतात, परंतु वास्तविक त्यांस शरीर देखील नाहीं; अर्थात् ह्यांचे स्त्रीत्व किंवा पुंस्त्व जसें नाहीं; तसेंच आत्म्यास नाही. आपण आपणांसी कळेना ॥ पाहों जातां आकळेना ॥ कशांस कांहींच मिळेना ॥ उदंडपणे ॥ ७ ॥ "जड शरीरच आपण या भ्रमें ॥ प्रियतमें गमली स्थिर जंगमें" (वामन.) अमुक माझें तमुक माझें, मी असा, मी तसा, मी शहाणा असें ह्मणतो, परंतु मी झणजे कोण हे मात्र ओळखीत नाही. हे शरीर झणजे मी असें समजतो. -परंतु बोलण्यांत मी शरीर असें न ह्मणतां, माझें शरीर असें झणतो. तं कोणतो हणून विचारले तर सर्व शरीर न दाखवितां हृदयावर हात ठेवितो. श्वरः सर्व भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति" ह्यावरून स्थळ बरोबर दाखवितो, परंतु नाटकांत जेवणाचा आविर्भाव दाखवितांना जसें तृप्ति व गोडी देत नाही तदत नुसत्या क्रिया बरोबर होत असतांही आत्मानुभव नाही व तो मिळत नाही याम गुरुकृपाच पाहिजे. एकलाच उदंड जाहला ॥ उदंडचि एकला पडला ॥ आपणास आपला गलबला ॥ सोसवेना ॥ ८॥ जसा एक वृक्ष आपणांत बीजरूपाने अनेक वृक्ष धारण करितो, व भूमीच्या संसर्गाने रुजून त्यांचेच अनेक वृक्ष होतात. ह्मणजे हा पहिलाच आपण कायम राहून (मूळ कायम राखून), आपल्याच अंशाने अनेक धारण करिता झाला. तद्वत् एकच परमात्मा सर्व वस्तुरूपांनी पसर मूळ पाहतां जरी अनेक दिसला तरी एकच आहे. एक असोनी फुटी पडली ॥ फुटी असोनी स्थिति एकली। विचित्र कळा पैसावली ॥ प्राणिमात्रीं ॥९॥ मागे दिलेल्या ओंवीवरून आत्मा व परमात्मा वस्तुतः एक असतांडी