या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. ७ आणि आठ यांचा अर्थ सोपा असावा. ह्मणून सविस्तर न सांगतां थोडक्यांत सांगतों-आपण अज्ञानामुळे देह-इंद्रियें-मन-बुद्धि यांना आत्मा झणतों. यांना होणारे विकार-सुख-दुःखें-आत्म्याची समजून दुःख करितो. हणून आत्मा अंतरांत नसून तो आपणास कळत नाही. वासनानुरूप आत्म्याला देह धारण करावा लागतो. ९:-एक असोनि फुटी पडली । फुटी असोनि स्थिति एकली । विचित्र कळा पैसावली । प्राणिमात्रीं ॥ अर्थः-आत्मा एक त्यास देह-भिन्नत्वामुळे निरनिराळेपणा आला आहे. सर्व प्राणिमात्रांत अशीच स्थिति आहे. ओव्याः सर्वो ठायीं एक ब्रह्म । अवघे देहासि नाम । सर्व प्राणिमात्राचे धाम । एक ब्रह्म ॥ १ ॥ श्री. सायखेडे (नासिक), २५।१०।१९०१, सा. नमस्कार विज्ञापना, यथामती उत्तरे दिली आहेत. अष्टधाप्रकृति गीडि सांगितली आहे. पंचकोश पंचदशीत सांगितले आहेत. आपल्यासारख्या किद्वानापुढे माझ्यासारख्यांनी उत्तरे देणे अयोग्य आहे. तथापि चुकल्याचे सांभाळणारे आपण आहांत झणून अगदी न घाबरतां उत्तरे दिली आहेत. आजपर्यंत कोकिळाने ज्ञानरस पाजून अंत:करणांतील ज्ञानाची वाढ केली. अयोग्याचा अनादर केला, योग्यास पदरी घेतले. याचप्रमाणे सोबत पाठविलेले अयोग्य ठरल्यास अनादर होईलच. दोषादोषांची माफी असावी. कमलबंध पाठविलेले आहेत. त्यांची योग्य व्यवस्था झाली असेलच. आपला:गजानन गोपाळ जोशी, मराठी-शिक्षक, नं०३. ॐतत्सत्. ॥ श्रीसद्गुरु प्रसन्न ॥ "नेणपण सोडूं नये, जाणपणे फुगों नये, नानाजनाचे हृदय, मृदु शब्द उकलावें" ॥ १॥ (दासबोध.)