या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १९०१. २७९ म० रा० केरळकोकिळकर्ते यांसी. सप्रेम सा० नमस्कार. वि० वि०. एके दिवशी पणजीस गेलों असतां दोघां चौघां मित्रमंडळींनी आपला (सप्टेंबरचा) अंक पाहिला काय झणून मोठ्या उत्सुकतेने विचारले. त्या वेळची ती त्यांची जिज्ञासा कांही निराळ्याच प्रकारची भासली; पण अंक पाहण्यास मिळाला नाही. दासबोधांतील ओंव्या, आणि त्या आपण विचारल्या आहेत, तेव्हां मलाही तो अंक पाहण्याची फार उत्कंठा लागली. इतक्यांत एकानें अंकही आणून दिला व झटले की, (हा मनुष्य कोकिळचा प्रेमळ भक्त आहे) केरळकोकिळकल्स या ओंव्यांचा अर्थ कसा लागला नाही ? कोणी ह्मणाले, त्यांनी ज्ञानेश्वरीचे वगैरे भाषांतर केले आहे, ते वेदांतशास्त्रांत निपुण आहेत, वेदांतशास्त्रासंबंधानें कोणास काही शंका असतील तर त्या निवारण करूं, असें त्यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत झटलें आहे; असें असता त्यांना या ओंव्या कशा लागल्या नाहीत, इत्यादि उद्गार काढून आश्चर्य प्रदर्शित केलें, व या ओंव्यांचा अर्थ त्यांना जरूर लिहून पाठवावा, असे ते त्या ओंव्या वाचून पाहून त्यांना शांतपणाने उत्तर दिले की, खरोखरच या ओंव्या कठिण व विचार करण्यासारख्या आहेत; या ओंव्यांचा अर्थ त्यांनी वि. चारिला आहे झणून त्यांची वेदान्तशास्त्राभिज्ञता कमी झाली, किंवा त्यांचा अ. नुभव अपक्क आहे, असें ह्मणतां येत नाही. कारण वेदान्तांतील तत्त्व. सर्व ठिकाणी एकच आहे, पण संतांनी आपापल्या बुद्धिकौशल्याप्रमाणे त्यावर रूपक केलें आहे, त्याचा उलगडा एखादे वेळी झाला नाही, ह्मणून त्या रूपकांतील अथवा कुवाड्यांतील तत्त्व त्यांस अवगत नाही. असे काही होत नाही; उलट प्रसिद्धपणाने त्यांनी विचारिले आहे, यावरून त्यांची निरभिमानता व्यक्त होते. वगैरे सांगून त्यांचे समाधान केलें; आणि रामदाससांप्रदायांतील कोणी गुरुपत्र आमचे मित्र आहेत त्यांस विचारून कळवितों. असे त्यांस सांगून त्यांची रजा घेतली; व डोंगरीकर महानुभाव श्रीकृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर यांचे शिष्यवर्य रा. रा. गोपाळराव दांडे व बाबनीमेस्त, राहणार बार्देस वेरें शांची गांठ घेऊन त्यांचा त्याविषयी अभिप्राय विचारला. ते ऐकून त्यांना धान वाटले व माथाळ्यावर दिलेल्या ओंव्यानुसार, त्यांनी आपला गौरव केला. त्या ओव्यांचे त्यांनी पुष्कळप्रकारे स्वानुभवपूर्वक विवरण करून सा