या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. ज HTTET आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण । मान , अधम आणि उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २॥ महीसुत सरसावला । सरसावून द्विधा केला। उभयतां मिळोन चालिला । कार्यभाग ॥ ३ ॥ श्वेताश्वेतास गांठी पडतां । मध्ये कृष्ण मिश्रित होतां । इहलोक सार्थकता । होत असे" ॥ ४ ॥ "विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होय चतुर । सद्यः प्रचीत साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ ( दशक १५, समास ६.) कळावें कृपा असावी हे विनंति. आपला सदैव उत्कर्षेच्छू, व मु. नेरूल बार्देश (पो. नोवागोवा).! संतांचा दासानुदासता०३।१२।१९०१. रामचंद्र कृष्ण कामत. नं० ४. ताजश्रीगजानन. बडोदें ता० २६-१०-१९०१ रा. रा. केरळकोकिळ पुस्तकाचे एडिटर साहेब यांस. विनंती विशेष. आपल्या माहे सप्टेंबर सन १९०१ च्या अंकांत पृष्ठ १९७ मध्ये श्रीदासबोध ग्रंथांतील पंधराव्या दशकाच्या पांचव्या समासापैकी पहिल्या नऊ ओव्यांचा अर्थ करून पाठविण्याविषयी सर्व साधारण रीतीनें आव्हान झालेले आहे. त्यास अनुसरून हा अर्थ पाठविला आहे. । अर्थ करण्यासाठी हे पुस्तक मजकडे काल ता० २५ मिनहू रोजी माझ्या मित्रांकडून आले, त्यामुळे हा अर्थ आपणांकडे पाठविण्यास इतका दिनावधि झालेला आहे. माझ्या समजुतीप्रमाणे त्या ओंव्यांचा अर्थ खाली लिहिल्याप्रमाणे होत आहे; व असाच मी आजपर्यंत समजत आहे. त्याजमध्ये कदाचित् कांही प्रमाद व गैरे असल्यास त्याचेही स्पष्टीकरण आपणांकडून येत्या अंकांत होईल अई। उमेद आहे.