या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. याकुत लोकांतील कोणत्याही मनुष्याने एखादा धंदा करण्याचे मनावर घेतले, तर त्यांत तो अगदीं पटाईत होऊन राहतो. तो एकाच वेळी जवाहिऱ्या, लोहार, तांबट, चांभार सुद्धा बनतो. त्याला बंदुकीचें सामान करता येते; हस्तीदंत कोरतां येतो; आणि थोडक्या अभ्यासानें तो पाहिजे ती कला साध्य करूं शकतो. परंतु त्यांना उच्च प्रतीचे शि- ' क्षण मिळण्याला काही मार्ग नाही, ही मोठी शोचनीय गोष्ट होय. हे लोक पहिल्या प्रतीचे गोलंदाज आहेत. थंडी असो, पाऊस असो, भूक असो, थकवा असो; पक्ष्याचा किंवा पशूचा पाठलाग ते सोडीत नाहींत. कोल्ह्याचा किंवा सशाचा ते लोक पाठलाग करूं लागले ह्मणजे दोनदोन दिवस सारखे पळत सुटतात. आपल्या किंवा आपल्या घोड्याच्या जिवाकडे सुद्धां पहात नाहींत. व्यापारांतही याकुत लोक मोठे तरबेज आहेत. ते सशाची व कोल्ह्याची कातडी इतकी जमवितात, व ती अशी कमवितात की त्यांचे त्यांना चांगलेच मोल येतें. ते बंदुका करतात; फण्या करतात; व त्या उत्तम असतात. त्यांनी तयार केलेले कातड्याचे बधले तर इतके उ. त्तम असतात की, त्यांत १०॥१० वर्षे पातळ पदार्थ ठेवला तर एक टिपूस बाहेर यावयाचा नाही! शिरोभागी दिलेले चित्र एका याकुत जातीच्या स्त्रीचे आहे. ह्यांच्यांतील पुष्कळ बायका रूपाने सुंदर असतात. त्या पुरुषांपेक्षा निमळ असून त्यांस पुरुषाप्रमाणेच पोषाख करणे आवडते. त्या आंगरखा घालतात, व डोक्यास टोपी घालतात. त्या टोपीला दोन चामड्याची शिंगें लावण्याची चाल आहे! व तोंडावर रंगारंगांचे पट्टे काढतात ! त्यामुळे त्यांच्या मूळच्या सौंदर्याला बराच उणेपणा येतो. त्यांना इतर स्त्रियांप्रमाणे चांगल्याचांगल्या वस्तूंचा फार शोक असतो. मोह हा सर्वत्रांना आहेच, तसा परमेश्वराने त्यांच्या पाठीमागेही लावलेला आहे. तरी त्या वाईट, नीच, हलकट अशा कधीही होत नाहीत. त्या आपल्या आईबापांना व सासूसासऱ्यांना केवळ देवाप्रमाणे पूज्य मानितात. त्या आपले पाय आणि डोके कधी कोणास दिसू देत नाहीत. त्यांच्यांत आणखी एक विलक्षण चाल आहे. ती ही की, त्या चुलीला