या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. उजवें घालून कधी जावयाच्या नाहीत. सासऱ्याच्या कोणत्याही माणसाचें नांव घेत नाहीत. ही मर्यादा जी स्त्री पाळीत नाही, तिला रानटी किंवा पशूप्रमाणे समजतात. आणि नवरा तर तिला निखालस कपाळकरंटी समजतो. असे पृथ्वीच्या पाठीवर अनेक भिन्नभिन्न जातीचे, भिन्नभिन्न रिवाजाचे, व भिन्नभिन्न रुचीचे लोक आहेत. व्याजोपदेश. श्लोक. वाटे चोरीचहाडी करुनि गुरुवरा दुष्पथा आक्रमा होवोनी मत्तचित्त प्रचुरतर परस्त्रीसिं वाटे रमावें । धर्मा देऊनि टाळा मम मन करवी सर्वदां दुष्ट चाळा तेही बापा सुखानें करि परि कथितों मार्ग तूतें निराळा ॥ १ ॥ कोठे सद्गुणरत्नरास झळके कोठे खरी वैखरी कोठें शांति उदारता विलसते कोठे सुधी अंतरीं । राहोनी बहु दक्ष लक्ष पुरवीं वृत्ती बकाची धरी. चित्ती हा दिन रात्र ही न ह्मणतां ह्यांचीच चोरी करीं ॥२॥ भक्तीने भगवंतभक्तभजनी दासाहिपेक्षां खपे येतां, तोच कृपाळ, काळ उलटा मातेहनीही जपे । हाकी स्यंदन चंदनास झिजवी उष्टींहि काढी करी कानी लागुनि नित्य तूं सकलिकां ह्याच्या चहाड्या करीं ॥ ३ ॥ साधी सत्कुलजा विरक्ति विधवा आहे तुला नोवरी लावीं शीघ्र पुनर्विवाह तिजशी संसार हा आवरी । पोटी घाल दया क्षमा खचुनि तूं प्राशी सुबोधामृत कोणाच्या जवळी असो ह्मणुं नको हा शूद्र की हा मृत ॥४॥ रूपें निर्मळ रम्य सुंदरवपू गंगेपरी गोमटी ऐशी ईश्वरभक्ति पाहुनि गड्या तूं घट्ट घालीं मिठी।