या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. झोंबें तीस अखंड दंड धरुनी ती आपलीशी करी आली सोडुं नको शिकार कधिही हा प्राण गेला तरी ॥५॥ हातीं नित्य विवेकशस्त्र धरुनी खासें तया पाजळीं । काढी कापुन षड्रिपूंतुनि पुढे येईल जो जो बळी । क्रोधाचे विष सत्य नाश करितं डोळ्यावरीही चढे त्याचा अंत करावया बघु नको केव्हांच मागे पुढे ॥ ६ ॥ लावोनीयां हृदयसदना दांडगेंसें कुलूप वैराग्याचें झडकरि वरीं ओतुनी शुद्धतप । अग्नी लावी भय न धरितां कोंडुनी त्यांत काम पोरां बाळां सकट ह्मणुं दे अक्षयीं रामराम ॥ ७ ॥ अहंता तंबाखू मुरडुनि करीं सुंदर विडी भरी केव्हां केव्हां सहज विनयाची गुरगडी। दमाने एका तूं प्रबळ झुरका एक चढवीं प्रबोधाग्निज्वाला प्रगट करुनी राख उडवीं ॥ ८ ॥ सदा वैराग्याची पिउनि मदिरा धुंद हृदयें निजानंदी राहें भ्रमत भुलुनी ज्ञानउदयें। धुळीमध्ये लोळे वमुनि दुरितें साधुचरणीं नुरो संसाराचे स्मरण अथवा लोकसरणी ॥९॥ बांधीं सारे जन उपकृती-रज्जुने घट्ट फार सबोधाचे प्रखर फटके त्यावरी नित्य मार । सद्भक्तीची दृढतर अशी शृंखळा ठोक पायीं सत्सेवेला निशिदिनि तया लाव नाना उपायीं ॥ १० ॥ ठेवी मानी प्रभुवर जसा बंदिमाजी स्त्रियांना जाणोनीयां अवखळ तशी ठेव तूं इंद्रियांना। ऐशी आणी वठणिस जणूं वेसणीचेचि पाडे खालीं माना करुनि नियमें ओढिती नीट गाडे ॥ ११ ॥