या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. मानाची थोर पाने चघळुनि बरवीं फोड भीती सुपारी जाळोनी गर्व सारा धवलवरि चुना कात हा स्वार्थ भारी । तृष्णेचे वेलदोडे घमघमित जरी नित्य तांबूल खाशी कांती वाढे मुखाची परिमळ पसरे पार नाहीं सुखाशीं ॥ १२ ॥ मांडोनी पुरुषार्थ चार पगडी संसारमायापटीं फासे टाकुनि नीट तीन गुण हे मारी बरी सोंगटीं । मोठे घातक पातकी विषय हे आणोनि लावी पणा सोडी नागवुनी धरोनि बसले पोटांत जो मीपणा ॥ १३ ॥ भूमी ही उंच शय्या गगनवर भला चांदवा रत्नयुक्त घालीती गोड वारा तुजशि दशदिशा सन्मती भोगभुक्त । पृथ्वीचा वायु वेगें परिमळ पसरी ज्ञान लावीं मशाल चद्रा लावोनि तंद्री मनन करित तूं लोळ बापा खुशाल ॥१४॥ बाबा दुव्र्यसने तुला न सुटती ही युक्ति त्याला भली प्राणाहूनि जपून ठेव हृदयीं दैवें तुला लाभली । श्रद्धा ठेवुनि वाग राग न धरी चालें पुढे ह्या रिती सार विश्व तुझेंच होउनि गड्या तोषेल लक्ष्मीपती॥ १५ ॥ लोकोत्तर चमत्कार. हालचाल करणारी यांत्रिक चित्रं. प्राण्यांची हुबेहुब चित्रे काढण्याची व करण्याची कला, प्राचीन कालापासून प्रत्येक देशांत थोड्याबहुत प्रमाणानें आहेच. आमचा देश आजमितीस जरी सर्वतोपरी मागसला आहे, गतवैभव झाला आहे, तरी त्यांत सुद्धा कलाकौशल्याच्या काहींना काहीतरी चिजा दृष्टीस पडतातच. ह्याला उदाहरण आपल्या महाराष्ट्र देशांतील लहानशा एका गोकाक शहराचेच पुरे आहे. ह्यांतील लांकडी फळफळावळ व चित्रे पाहून सर्व जगांतील लोक सुद्धा तोंडांत बोट घाल.