या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८. २२६ त्या ईश्वरालाच ज्या अर्थी तुमच्या मार्फत माझा मृत्यु लौकर आणण्याचे आवडले, त्या अर्थी मी तो शांतपणाने पतकरते. आणि दीर्घायू होऊन माझ्यासारख्या अल्लड पोरीच्या हातांत सारे जग राहण्यापेक्षा, परमेश्वराने माझं आयुष्य कमी केले, ह्याबद्दल अंतःकरणपूर्वक त्याचे आभार मानते." - अशा प्रसंगी सुद्धां मेरी राणीचा आणि तिचा पत्रव्यवहार चालू होताच. तिच्या एका पत्रांत, आपल्या विरुद्ध शिक्षा झाली होती तरी झालेला न्याय तिने मान्य केलाच. पण एवढे लिहिलें: " तथापि माझी बालंबाल खात्री आहे की, परमेश्वरापाशी, मी ज्या स्थितीत राज्यपदाचा उपभोग घेतला, तो अपराध अतिशय क्षल्लक आहे. कारण, मला बलात्काराने दिलेल्या मानमरातबांचा संस्कार देहालाच काय घडलेला असेल तेवढा; बिचाऱ्या अंतःकरणाला त्याचा विटाळही झालेला नाही." ह्याशिवाय, तिने आपल्या इष्ट आप्तांसही अनेक पत्रे लिहिली. त्यांत तिने आपल्या बहिणीलाही एक पत्र ग्रीक भाषेत लिहून त्यांत ' झालेल्या इन्साफाबद्दल धैर्य सोडूं नको; खेद करूं नको; दःखाने विव्हळ होऊ नको,' इत्यादि उपदेश केला होता. लाटिन भाषेत तिने चार पत्र लिहिली, ती शिरच्छेदाच्या आदल्या रात्रीची आहेत. त्यांत ग्रीकच्या रिवाजाप्रमाणे मृत्युलेख लिहिलेला आहे. तिला एक वेळ शेवटची भेट देण्याविषयी तिच्या प्रियपतीने विति केली होती. पण तिने त्याला परत निरोप असा पाठविला " हे थोडेसे वियोगजन्य दुःख धीरान सहन करावें. कारण की जेथें ददेव आड यावयाचे नाही; निराशा पुढे उभी रहावयाची मादी. मृत्यची केसास सुद्धां धक्का लावण्याचा मगदूर नाहीं; अशा स्थळी आपण आता लौकरच भेटूं आणि मग खुशाल एकत्र राई, ती किल्लयावरच्या खिडकीत उभा होती. इतक्यांत तिचा प्रियपति शिरच्छेदास जात असलेला तिच्या दृष्टीस पडला. त्यास तिने मनांतल्या मनांतच वंदन केले, आणि हातरुमालानें “तली चला पढ़ें, मीही आलेच !" अशा अर्थाची खूण केली आणि · अहो गिल्फर्ड! अहो गिल्फर्ड!' येवढेच शब्द तोंडांतल्या तोंडांत ह्मणाली. ह्या २९