या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. तात! ऊस, आंबे, पेरू, मिरच्या, भेंड्या इत्यादिकांनी फसला जाणार नाही, असा कोणता मनुष्य ? व कबूतरें, उंदीर, सर्प, इत्यादिकांस फसला जाणार नाही असा कोणता प्राणी? ही आपल्या महाराष्ट्रदेशाची गोष्ट झाली. युरोपखंड तर सर्वच गोष्टींत आजकाल अघाडी मारतें आहे. तेव्हां तें चित्रकलेत तरी मागें कसें राहणार ? फोटोग्राफ, ऑइलपेंटिंग, पुतळे इत्यादि जिन्नस तर त्या देशांत अगदी पहिल्या प्रतीचे होतात. तेव्हां अर्थातच हुबेहुब चित्रे काढणे व करणे ह्यांत लोकांस कांहीं विशेष वाटेनासे झाले आहे. कारण, ती विद्या आतां बहुतेक करतलामलकवत् झाल्यासारखीच बहुतेक झाली आहे. तेव्हां तींत आणखी विशेष काहीतरी नवी टूम काढण्याकडे लोकांचें-कारागिरांचेलक्ष्य लागावें हे साहजिकच आहे, व तसे लागलेंही पण आहे. ही नवी टूम मणजे अर्थात् चित्रामध्ये हालचाल उत्पन्न व्हावी ही होय. थोड्या दिवसांपूर्वी 'भिओटोग्राफ' नामक हालचाल करणाऱ्या चित्रांची माहिती आमच्या कोकिळांत दिलेली वाचकांच्या स्मरणांत असेलच, व ती कला लौकरच सर्वसाधारण होईल ह्यांत शंका नाही. पण ती काढलेल्या चित्रांची हालचाल झाली. केलेल्या चित्रांत परिपूर्ण हालचाल दाखविण्याच्या कामांत अद्याप कोणताही कारागीर यशस्वी झालेला नाही. तरी, प्राचीन कालापासून तयार केलेल्या पुतळ्यांत किंवा चित्रांत हालचाल उत्पन्न करण्याविषयी बऱ्याच कुशल पुरुषांनी यत्न केले होते असें इतिहासावरून दिसून येते. आणि त्यांतील कितीएकांस विलक्षण तन्हेचे यशही पण आलेले होते. टारेनटम येथे राहणारा अचिंटास ह्या नांवाचा कारागीर इ. स. पूर्वी ४०० वर्षे होऊन गेला. त्याने एक कबूतर तयार केले होते. ते आपल्या पंखांनी भरकन उडून जावें अशी त्यांत कळ साधली होती. पण तें परत येण्याला, किंवा त्याची ती गति बंद होण्याला काही मार्ग नव्हता. पण त्याच्या आलीकडचें एक उदाहरण फारच अद्भुत असून त्याची माहिती विशेष भरंवशाची आहे. जॉन मुल्लर ह्मणून जर्मनी देशांत एक मोठा कुशल कारागीर होता. त्याने एक कळसूत्री गरुड तयार केला होता. तो मैल मैल लांब भरारी मारी; आणि विशेष चमत्काराची गोष्ट ही की, तो परत निघाल्या ठिकाणी येत असे. नारेमबर्गचा बादशहा एक वेळ म्याक्सिमिलियनास ११