या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. भेटावयास गेला होता. तेव्हां त्यास हा कृत्रिम गरुड एक मैल सामोरा गेला होता, व बादशहाची स्वारी लव्याजम्यानिशीं वेशीपाशी येत आहे तों, हे पक्षिराज सीआधी परत येऊन महाद्वारावर येऊन स्वागत करण्याकरितां तिष्ठत बसले होते ! तो चमत्कार पाहून बादशहा फार खूष झाला, आणि त्याने त्या कारागिरास मोठे बक्षिस दिले. ह्याच मुल्लरनें एक लोखंडी माशी तयार केली होती. ती त्याच्या हातांतून उडे, आणि आसापास बरीच मोठी चक्कर मारून पुन्हा परत त्याच्या हातावर यऊन बसत असे. ह्या गोष्टीवरही कोठे आक्षेप ऐकू येतात; परंतु खालची माहिती तर अगदी निर्विवाद खरी आहे. पस्ट इडाज बेटांमध्ये सेंट ख्रिस्तोपर' ह्मणन फ्रेंच लोकांच्या कांहीं वसाहती आहेत. त्यांच्या तर्फेने इ. स. १६८८ मध्य कनल Si निस त्या गृहस्थाने इंग्लिश लोकांशी टक्कर देऊन मोठा जय संपादन कला. हा गृहस्थ यांत्रिककलेमध्ये निष्णात असल्याबद्दल फार ख्यात आहे. ह्याने एक मोर केला होता. त्याच्या पोटांत अशा हा चमत्कारिक यंत्ररचना भरली होती की, तिच्या साधनाने तो जिवत माराप्रमाणे खुशाल हिकडेतिकडे फिरत असे. येवढेच नव्हे, तर तो आपला पिसारा उभारी: मनोरम नृत्य करी; आपल्या चोंचीन दाणे टिपी; ते गिळी; आणि ते कोठ्यांत पचवून मयूरपक्ष्याप्र हुबहुब मलद्वारांतून बाहेर शीट टाकित असे! तेव्हां त्या कारागिरावसब किती अप्रतिम! आणि बुद्धि केवढी अचाट! परतु थोड्याच दिवसांत हेही कसब मागे पडले. कारण, पुढें फ्रेंच कारागार हाकनसन ह्याने एक राजहंस तयार केला. त्याच्या रचनेंताल चातुय ह्याहूनही अगाध होते, हा राजहंस आकाराने खऱ्या राजहसायवढा असून दिसण्यांत तर केवळ तत्सदृश केलेला होता. हा पक्षा इ. स. १७३८ मध्ये पारिस शहरांतील लोकांस दाखविण्यांत आला. त्या वेळेस सर्वांची अगदी चकभूल झाली. कित्येकांस तर हा खरोखर जिवंत पक्षीच असावा अशीही भ्रांति पडल्यावांचून राहिली नाही. त्याच्या पंखांला व शरीराला खऱ्या राजहंसाचींच पिसें फार कुशलतेने लावलेली होती. आंतील हाडांची रचना सुद्धा अगदीं यथाशास्त्र व यथाप्रमाण केलेली होती. त्यास किल्ली दिली झणजे तो