या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. हुबेहुब हंसा खाई, पिई, आणि ब सुटत नसे. हुबेहुब हंसाच्या ढबीप्रमाणेच डुलतडुलत चालत असे. तो आपले पंख हालवी, खाई, पिई, आणि सर्वांत अपूर्वतेची गोष्ट ही की, कोणत्याही कृत्यांत त्याची स्वाभाविक ढब सुटत नसे. त्याच्या पक्वाशयांत रसायनिक द्रव्यांचे संमेलन केलेले असे. त्यामुळे तो जें जें खाई त्याचे जिवंत पक्ष्याप्रमाणेच पचन होई. तो हंसाप्रमाणेच अगदी हुबेहुब 'क्याक् क्याक् ” असा ओरडे. आणि तो शब्द कृत्रिम आहे ही गोष्ट अगदी मनांत सुद्धां येत नसे. पण ह्या सर्वांपेक्षा त्या कारागिराचें त्यांतील एक कसब विशेष तारिफ करण्यासारखे होते. त्यावरून आपल्यांतील भोजकालिदासांच्या एका आख्यायिकेचे स्मरण झाल्यावांचून रहात नाही. भोज राजाच्या सभेत एका चतुर सोंगाड्याने एकदां एका नंदीबैलाचे सोंग आणले होते. ते इतकें हुबेहूब होते की, तें पाहन भोज राजाने शालजोडी वगैरे मोठे बक्षिस दिले. त्या वेळी हजारों लोक जमले होते. त्यांत एक घोंगडे पांघरलेले गुराखी पोर होतें. त्याने हळूच एक जमिनीवरचा खडा उचलून तो त्या बैलाच्या पाठीवर टाकला. तो खडा पडतांच त्या कृत्रिम बैलानें तत्काल भोंवरा केला. तो पाहून तो मुलगा फार खूष झाला, आणि त्याने आपल्या आंगावरचे पटकूर मोठ्या आनंदाने त्या बहुरुप्याच्या आंगावर फेंकून दिले. बहुरुप्यानेही त्या अल्प देणगीचा परम आदरानें स्वीकार केला, आणि मोठ्या नम्रत्वाने सर्वांदेखत त्या गुराख्यास मुजरा करून मोठे आभार मानिले; व ह्यानेच माझ्या कसबाची खरी पारख केली असें ह्मणाला. राजानेही त्या गुराख्याची समयसूचकता व गुणग्राहकता जाणून आपल्या आश्रयास ठेवला, व तोच पुढे कालिदास ह्या नांवानें विख्यात पंडित झाला. अशी ही एक जुनी आख्यायिका आहे. अशीच एक खुबी वरील कारागिराने आपल्या कृत्रिम राजहंसामध्ये ठेवून दिली होती. बदकें व राजहंस ही एका वर्गातील होत, हेही वाचकांस फार करून माहित असेलच. ह्या वर्गातील पक्षी पाणी वगैरे पितांना ‘मचामचा' अशा एक प्रकारच्या मिटक्या मारतात, आणि आपल्या चंचूच्या अग्राने पाण्यास अशी कांहीं गति देतात की, तेणेकरून तेथील पाण्यास एकामागून एक भोंवरे पडत जातात. हा सर्व प्रकार वर सांगितलेला.