या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ___केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. कृतीचा राजहंस बरोबर करित असे. मग पाहणारांस खऱ्या राजहंसाचा भ्रम पडावा, ह्यांत नवल ते कोणते? बेकमन ह्मणून एक गृहस्थ होता. तो इ. स. १७६४ मध्ये रशियामध्ये प्रवास करीत हिंडत होता. तेव्हां त्यास सेंटपिटर्सबर्गजवळ झास्कोसिलोच्या राजवाड्यांत एक यांत्रिकचित्रांचा संग्रह दृष्टीस पडला. ही चित्रं व्हान् कान्सन्पासून विकत घेतलेली होती. ती चित्र त्याने सरकारापासून घेतली आणि सर्व युरोपखंडभर दाखवीत फिरू लागला. वर सांगितलेला राजहंस हा त्यांमध्येच होता. तो खात असे, पीत असे व चालत असे, हे पूर्वी सांगितलेच आहे. कांहीं दिवसाना त्याच्या फांसळ्यावरची पिसें निघून आंतील रचना उघडी पडला. ती पाहणारा एक मनुष्य ह्मणतो की आंत एक फिरणारा रूळ असन बारीकबारीक सांखळ्यांनी त्यांत गति उत्पन्न कलला अस. हा आतील सर्व रचना विशांतील घड्याळाप्रमाणे होती. त्याच पावस खर हंसाच्या पायायेवढे असन त्यांतून सर्व यंत्रे सुरू होत. व्हान् कान्सन् ह्याने असाच एक मुरलीधर तयार केला होता. तो पारा चालावर मुरली वाजवी. ही मुरली जर्मनी त-हेची असून ती वाजावताना त्याच्या तोंडांतुन वारा निघत असे, आणि स्वराच्या उच्चनाचतप्रमाण तो आपल्या बोटांनी पाहिजे ती भोंकें बंद करी व उघडी मोडी प्रोफेसर बेकमनने दान कानसन्ची जी चित्रे पाहिला, त्यात ९ हा एक हात. पण पुढें तें बिघडन त्यांतून कांहीं थोडेसे सूर मात्र निघत, आणि तेही अस्पष्ट असत. पण मुरली वाजविण्याच्या चित्रांत पुढे ह्याहूनही सुधारणा झाली. काही वर्षापूर्वी लंडनांतील ओडलेड ग्यालरीमध्ये एक चमत्कारिक पदाथीचे प्रदर्शन झाले. त्यांत दोन मुरली वाजविणाऱ्या स्त्रिया ठेवल्या होत्या. त्या नाना प्रकारच्या गति व पये वगैरे सुखर वाजवित. तरी ते वर काहींसे रुक्ष व भणभणीत असत, आणि मूर्ति निर्जीवशा भासत. ती यंत्ररचना पुष्कळ वर्षांच्या पूर्वीची असल्यामुळे, आणि ती नादुरुस्त स्थितीत असल्यामुळे, तसें दिसणे साहजिकच आहे.