या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ अंक ४ था. एप्रिल १८९८. राजयोग. प्रकरण तिसरें. मा प्राण. पुष्कळ लोकांस असे वाटते की, प्राण हा श्वासोच्छासांपैकीच कसला तरी एक भेद आहे. पण ती त्यांची चुकी होय. श्वासोच्छासाशी त्याचा संबंध अ. सला तर तो फारच थोडा असला पाहिजे. खऱ्या प्राणायामापर्यंत पोचण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्यांपैकी श्वासोच्छास हा फक्त एक मार्ग आहे. प्राणायाम ह्मणजे प्राणावर सत्ता चालविणे, त्याला आपल्या ताब्यांत आणणे, भरतखंडातील तत्त्वज्ञान्यांच्या मताप्रमाणे, हे सर्व ब्रह्मांड दोनच तत्त्वांचे बनलेले असून, त्यांतील एकास आकाश असें ह्मणतात. तें सर्व व्यापक असून दरोबस्त दृश्य पदार्थात शिरून राहिलेले आहे. प्रत्येक आकारास आलेली वस्तु, ह्या आकाशाचीच बनलेली आहे. हवा, पातळ पदार्थ, घन पदार्थ ही सर्व आकाशाचीच बनतात. सूर्य, पृथ्वी, चंद्र, तारे, धूमकेतु हे सर्व आकाशाचेच बनतात. प्रत्येक जड पदार्थ, पाणी, वनस्पती, प्रत्येक दृष्टिगोचर होणारा आकार, प्रत्येक ज्ञान होणारा पदार्थ, प्रत्येक अस्तित्वात असलेला पदार्थ आकाशाचाच बनतो. आकाश हे स्वतः दृष्टिगोचर होऊ शकत नाही. ते इतकें सूक्ष्म आहे की, सर्वसाधारण पदार्थाच्या अगदी पलीकडे. हे ज्या वेळेस घन होतें, आकार धारण करते, त्याच वेळेस दृग्गोचर होते. सृष्टि निर्माण होण्याच्या प्रारंभी हैं आकाश मात्र असते; आणि प्रळयकाळाच्या वेळी घन पदार्थ, पातळ पदार्थ, आणि सारे वायु, हे पुन्हा ह्या आकाशांतच वितळून जातात; आणि पुन्हा तशीच नवी सृष्टिही ह्या आकाशापासूनच उत्पन्न होते. ह्या आकाशापासून हे ब्रह्मांड कोणत्या सामर्थ्याने उत्पन्न होतें ? तर प्राणाच्या सामर्थ्याने. आकाश हे जसें मूळ, सर्वव्यापी, ह्या ब्रह्मांडाचें घटकावयव आहे, त्याप्रमाणेच प्राण हेही मूळ, सर्वव्यापी, ह्या ब्रह्मांडास उत्पन्न करणारे तत्त्व आहे. सृष्टि निर्माण होण्याच्या वेळी आणि लय पावण्याच्या वेळी प्रत्येक वस्तु आकाशरूप होते. आणि सर्व ब्रह्मांडांत प्रचलित असणाऱ्या दरोबस्त शक्ति परत प्राणामध्ये लय पावतात. आणखी दुसरा कल्प सुरू होण्याच्या वेळी ज्या प्रत्येकीला आही चेतना ह्मणतों, शक्ति ह्मणतो, त्या प्राण्याच्याच बनतात.