या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. चैतन्याच्या ज्या ज्या ह्मणून क्रिया तो तो प्राण. पृथ्वी आकर्षण करणे, लोहचुंबग्राहक शक्ति उत्पन्न होणे, हीही प्राणाचीच स्वरूपें होत. शरीराचें चलनवलन, ज्ञानतंतूंचा प्रवाह, विचारशक्ति इत्यादि उत्पन्न होणे ह्यांचेही नांव प्राण. विचार करण्यापासून तों अगदी खालच्या शारीरिक चलनवलनापर्यंत ज्या कृति त्या सर्व प्राणाच्या होत. ब्रह्मांडांतील यच्चयावत् मानसिक किंवा शारीरिक शक्ति पुन्हा जेव्हां मूळ स्वरूपांत लय पावतात, तेव्हां त्यास प्राण असें ह्यणतात. "ज्या वेळेस हेही नसते, आणि तेंही नसते, आंधारच आंधाराला आच्छादून असतो, त्या वेळेस असते तरी काय ?" तर अचल असें आकाश. प्राणाचा शारीरिक शक्तिही लयास जाते, परंतु तो अस्तित्वात आला की, त्यास वा पुन्हा पूर्ववत् प्राप्त होते. सर्व प्रकारच्या प्रवृत्ति, ज्या ब्रह्मांडामध्ये प्रगट शालल्या दिसतात, त्या अर्वाचीन शास्त्राप्रमाणे अविकृत अशा आहेत. एक समाप्त झाला की, झाडून साऱ्या प्रवृत्ति, अशा प्रकारे अगदी लयास जाजन स्तब्ध होतात. आणि दुसऱ्या कल्पाच्या प्रारंभी त्या पुन्हा उठन आकाशाला चतावतात. आणि त्यामुळे आकाशापासून हे नानाप्रकारचे आकार उत्पन्न होतात. आकाशाचे जसें रूपांतर होते, तसें प्राणाचेही रूपांतर होऊन या सव प्रवृत्तींची स्वरूपें व्यक्त होतात. त्या प्राणाचे ज्ञान करून घेणे, आणि त्यावर सत्ता चालविणे, हेच काय ते खरोखर प्राणायामाने साधावयाचे असते. त्याच्याच योगाने आझांस अपरिमित सामर्थ्यांचे द्वार खुलें होतें. उदाहरणार्थ समजा का, एखाद्याला प्राण झणजे काय ते समजले, आणि त्यावर परिपूर्ण सत्ताही चालवितां येऊं लागली. तर जगावर अशी कोणती गोष्ट आहे की, ती त्याच्या ताब्यांत येणार नाही ? त्याला सर्य किंवा तारेही, त्यांच्या त्यांच्या स्थानापासून हालवितां येतील. ब्रह्मांडांतील एखाद्या सक्ष्म परमाणपासून तों तहत सूर्यासारख्या प्रचंड वस्तूवरहा तो सत्ता चालवील. कारण, त्याच्या आंगीं प्राणावर सत्ता चालविण्याचे सामर्थ्य असते. प्राणायामाचा उद्देश आणि फळ हेच आहे. योगी पूर्णावस्थेस पोंचला ह्मणजे त्याच्या ताब्यांत न चालणारी अशी एकही वस्तु ब्रह्मांडामध्ये नाही. त्याने देवांना जर 'या' ह्मणन आज्ञा केली, तर ते आज्ञेबरोबर हजर होतील. त्याने मृतांना येण्याविषयीं हकम केला तर, तेही दत्त करून पुढे उभे राहतील. सृष्टीतील दरोबस्त शक्ति, त्याच्या गुलामाप्रमाणे आज्ञाधारक होऊन राहतील. हे योग्याचे सामर्थ्य एखाद्या वेळी जेव्हां अज्ञान्यांच्या दृष्टीस पडतें, तेव्हां ते त्यास अद्भुत चमत्कार असें ह्मणतात. आर्य लोकांच्या मनाची एक वि