या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. शेष गोष्ट आहे ती ही की, ते नेहमी मूळ सिद्धांताला गांठ घालतें. बारीक सा. रीक भेदाकडे तें आधीं पहातच नाही. वेदामध्ये असा एक प्रश्न केलेला आहे की, “प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेल असें ज्ञान कोणतें ?" आणि ह्याला अनुसरूनच त्यांचे सारे ग्रंथ व शास्त्रे लिहिली गेली आहेत. त्यांत प्रत्येक गोष्ट जिच्या योगाने समजेल अशा एका गोष्टीचे प्रतिपादन केले आहे. विश्वाचा खडान्खडा आपणास समजावा, असें जर एखाद्या मनुष्याने मनांत आणले, तर त्याला प्रत्येक प्राण्याची, दरोबस्त वाळूच्या कणांची सुद्धा माहिती झाली पाहिजे; आणि त्याला तर अनंत कालही पुरावयाचा नाही, आणि तें सारें त्याला समजणेंही शक्य नाही. तर तें ज्ञान व्हावें कसें ? ही सारी माहिती त्याला समजण्याचा संभव तरी आहे का ? योगी असें ह्मणतो की, ह्या विशेष स्वरूपांच्या पलीकडे एक सर्वसाधारण स्वरूप आहे; ह्या विशिष्ट कल्पनांच्याही पलीकडे एक गूढतत्त्व आहे. तें तुह्मी समजून घ्या; ह्मणजे सर्व काही तुझांस समजेल. वेदांत सांगितले आहे की, अखंड अस्तित्वांत राहणारे एकच तत्त्व आहे. त्याच्याच योगाने हैं सर्व ब्रह्मांड चालते. त्या पूर्णतत्वाचें-परब्रह्माचें-ज्यास ज्ञान झाले, त्यास सर्व ब्रह्मांडाचें ज्ञान झाले. तशाच प्रकारे ह्या प्राणापासून सर्व शक्ति उत्पन्न झाल्या आहेत. ज्याला प्राणाचें ज्ञान झाले, त्याला ब्रह्मांडांतील सर्व शक्तींचें ज्ञान झाले झणून समजावें. मग त्या शक्ति शारीरिक असोत की मानसिक असोत. ज्याने प्राणावर अंमल बसविला, त्याने आपल्या स्वतःच्या मनावर आणि अस्तित्वांत असलेल्या इतर मनावरही अंमल बसविला ह्मणून समजावें. ज्याने प्राणावर अंमल बसविला त्याने आपल्या शरीरावर आणि अस्तित्वात असणाऱ्या सर्व देहावर अंमल बसविला. कारण, प्राण हेच शक्तींचें मूळ रूप आहे. प्राणावर अंमल कसा बसवावा-त्यावर कशी सत्ता चालवावी-ह्याला प्राणायाम हे एक साधन आहे. सारे अभ्यास आणि शिक्षणे तेवढ्याकरितांच आहेत. ह्मणून प्रत्येक मनुष्य ज्या स्थितीत असतो, त्याच स्थितीत त्याने अभ्यास सुरू केला पाहिजे. आणखी, आपल्या अगदी जवळच्या ज्या ज्या वस्तु असतील, त्यांच्या त्यांच्यावर सत्ता चालविण्यास शिकले पाहिजे. आपल्याला अगदी जवळची वस्तु ह्मणजे हे शरीर. ब्रह्मांडांतील कोणत्याही वस्तूपेक्षां जवळची वस्तु तीच, आणि मन हे सर्वांहून जवळचें, आणि आपल्या मनावर व देहावर कार्य करणारा प्राण, हा ब्रह्मांडांतील इतर सर्व प्राणांहून फार जवळचा आहे. ही लहान प्राणलहरी, जी आपल्याला स्वतःची मानसिक आणि शारीरिक प्रवृत्ति