या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. मनाची गोष्टही तशीच. प्रत्येक जड पदार्थ ईथरचा बनलेला असतो. जड पदार्थावर प्राणांची क्रिया झाल्यावर त्यांचेच निरनिराळे पदार्थ बनतात हे सांगितलेच आहे. हीच क्रिया अति सूक्ष्म रीतीने व अति वेगाने होऊ लागली झणजे त्याच ईथरचें मन बनतें, व झणून ह्या मनाचा प्रत्येक विश्वांतील पदार्थाशी (जड पदार्थ तितके ईथरचेच असल्याने ) संबंध असतोच. ती सूक्ष्म क्रिया यत्किचित् जरी तुझांस प्राप्त होईल, तरी तुझांला समजेल व वाटेल की, हे सर्व ब्रह्मांड त्याच सूक्ष्म चलनाने बनलेले आहे. कधी कधी काही औषधांच्या आंगी असा गुण आढळून येतो की, त्याच्या योगानें ज्ञानमार्गाच्या द्वारे आ. ह्यास त्या स्थितीला पोंचतां येते. आपल्या पैकी पुष्कळांना सर हम्फ्रे डेव्ही व्याच्या प्रयोगाची आठवण असेलच. तो वाजवीपेक्षां फाजील हास्यजनक पोटांत जाऊन व्याख्यान देतांना मुर्छा येऊन पडला, आणि सावध र हणाला की 'सारें ब्रह्मांड कल्पनामयच होऊन गेले होते. कारण, तेवढ्या वे. ळात जड लहरी बंद पडल्या होत्या, आणि सूक्ष्म लहरी ज्यांना त्याने मन असे हटले, तेवढेच ठिकाणावर होते. त्याच्या सभोवार असलेल्या सूक्ष्म लहरी मात्र त्याला दिसत होत्या. प्रत्येक वस्तूला विचार आहे. आणि सर्व ब्रह्मांड है पचाराचा समुद्र आहे. तो किंवा दुसरा कोणीही थोड्याशा विचाराच्या भों वांत सांपडतोच. अशा प्रकार विचारब्रह्मांडामध्ये आपणांस ऐक्य दिसन येते. आणि सरतेसामाझा जेव्हां मूळ स्वरूपास पोचतों, तेव्हां आपणांस कळून चुकते की, आमवरूप (व्यक्तिमात्रांत काय तो भेद पण आत्मा एकच) हेही एकत्र असू शकत. चैतन्याच्या पलीकडे आहे असा काय तो एक. व्यक्त झालेल्या चैतन्यामध्ये सुद्धा एक ऐक्य असतेंच, ह्या सत्य गोष्टी कधीही लयास जावयाच्या नाहात. कारण, अर्वाचीन शास्त्रांनी त्या सप्रमाण सिद्ध केल्या आहेत. अर्वाचान पदाथविज्ञानाने सुद्धा असें सिद्ध करून दिले आहे की, ब्रह्मांडांतील यच्च. यावत् व्यक्त व अव्यक्त शक्तींची गोळाबेरीज ही ठरीव असते ह्मणजे कधी बदलत नाही. त्याने असे सिद्ध केले आहे की, झाडून साऱ्या शक्ती दोन प्रकारच्या असतात. एकदां ती आच्छादलेली, संकुचित आणि स्तब्ध अशी असते, आणि पुन्हा ती क्रियारूपाने व्यक्त होते. अशा प्रकारें अनंत कालपर्यंत त्या व्यक्त व अव्यक्त होत असतात. ह्या प्राणावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे अंमल चालविणे ह्यालाच प्राणायाम असें झणतात.