या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. ९१ प्राण ताब्यांत ठेवण्याची संवय लावणे, ह्याशिवाय श्वासोच्छासाशी प्राणायामाला काहीच कर्तव्य नाही. मनुष्यदेहांत प्राणाचे अतिशय स्पष्ट स्वरूप झटले हणजे फुप्पुसाची हालचाल हे होय. ती आटपली की, देह आटोपला; ही थांबली की, शरीरांतील शक्तींची स्वरूपेही थांबलींच. कितीएकांनी अशाही रीतीचा अभ्यास केलेला असतो की, ही हालचाल थांबली तरी शरीर वांचते. कितीएक लोक असे आहेत की, ते कितीएक महिने आपणा स्वताला पुरून घेतात, आणि श्वासोच्छासावांचूनही जगतात. परंतु साधारण मनुष्यांच्या शरीरामध्ये ही फुप्पुसांची गति मुख्य आहे. अत्यंत सूक्ष्मपणाला पोंचावयाचे, तर आपणांस अधिक जडाची मदत घेतली पाहिजे. आणि मग आह्मांला आपला अतिसूक्ष्माचा पल्ला गांठीपर्यंत, हळू हळू प्रवास केला पाहिजे. शरीरातील सर्व शक्तींमध्ये प्रमुख शक्ति झटली झणजे फुप्पुसाची व तीच इतर सर्वभागांस चालू ठेवणारे उड्डाणचक्र होय. खरोखर प्राणायाम झणजे ही फुप्पुसाची शक्ति आपल्या सत्तेखाली आणणे. ह्या शक्तीचा श्वासोच्छासाशी संबंध असतो. श्वासोच्छ्रास काही ती शक्ति उत्पन्न करीत नाही, तर उलट तिच्यापामन मात्र श्वासोच्छ्वास उत्पन्न होतो. ही गति बंबाच्या कृतीने हवा आंत आढून येते. प्राण फुप्पुसे हालवितो, आणि फुप्पुसाची गति हवा आंत ओढून घेत. माणन प्राणायाम हा कांही श्वासोच्छास नव्हे, तर फुप्पुसाला हालविणान्या स्नायूंच्या शक्तीवर सत्ता चालविणे; आणि जी ज्ञानतंतूच्या द्वारे स्नायूंत शिरते; स्नायूंतून फुप्पुसांत जाते, आणि त्यांना एका विवक्षित रीतीने हालविते, ती स्नायूची शक्ति हाच प्राण. तो प्राणायामाचा अभ्यास करून आझांस ताब्यांत आणला पाहिजे. हा जेव्हां ताब्यांत येतो, तेव्हां आपणांस लागलेच कळून येते की, शरीरांतील इतर सर्व प्राणांच्या क्रिया हळू हळू आपल्या ताब्यांत येऊं लागतील. मी स्वतः असे मनुष्य पाहिलेले आहेत की, त्यांनी शरीरांतील सर्व स्नायु आपल्या ताब्यांत आणलेले होते. आणि कां येऊ नयेत ? एखाद्या विवक्षित स्नायूवर जर मला सत्ता चालविता येते, तर शरीरांतील प्रत्येक स्नायूवर व सर्व ज्ञानतंतूवर ती कां चालू नये ? ह्यांत असंभाव्य तें काय ? सांप्रत ती सत्ता नाहीशी झाली आहे आणि गतिही कुंठित झाली आहे. आमच्या इच्छेप्रमाणे आमांस कान हालवितां येत नाहीत. पण जनावरांना ते हालवितां येतात. ती शक्ति आझाला नाही. कारण, आही त्याचा अभ्यास करीत नाही. कुलसांसर्ग ह्मणतात । ह्यालाच.