या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. - आणखी आपणांस माहीत आहे की, गुप्तशक्ति असते ती परत व्यक्त रूपास आणतां येते. अतिशय परिश्रमाने आणि अभ्यासाने शरीरातील कितीएक अतिशय गुप्त असणाऱ्या शक्ती परत सत्तेमध्ये आणतां येतात. अशा रीतीने विचार केला तर त्यांत असंभाव्य असे काही नाही असे आढळून येते. इतकंच नव्ह तर, शरीरांतील हरएक भाग, पूर्णपणे आपल्या सत्तेत आणतां येतो. हे योगी, प्राणायामाच्या योगेंकरून करतो. आपणांपैकी कित्येकांनी कदाचित अशा ग्रंयातून वाचलेच असेल की, प्राणायामामध्ये श्वास आंत घेतांना आपण आपले यशरार प्राणाने भरले पाहिजे; आणि इंग्रजी भाषांतरामध्ये प्राण झणजे श्वासोच्छ्वास असें झटले आहे, तेव्हां हे कसे करावयाचें? अशी आपणांस शंका येईल अस आपण विचाराल, पण तो दोष भाषांतरकर्त्यांचा आहे. शरीराचा प्रत्येक मान, प्राणान-ह्या जीवतत्त्वानें-भरतां येतो. ते आपणांस येऊ लागले झणजे सर्व शरीरावरही सत्ता करता येते. शरीरांत असलेल्या सर्व व्याधि व दुःख माजवर पर्ण रीतीने मना चालविता येते. इतकेच नव्हे, तर दुसया भाष व दुःखें ह्यांवरही पूर्ण रीतीने सत्ता चालवितां येते. जगांतील प्रवक वस्तु सासगिक आहे. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. तुमचे र एखाद्या विकारानें व्याप्त झालेले असेल, तर तोच विकार दुसऱ्याच्या उत्पन्न करण्याचा त्यास धर्म येईल. तुझी जर धट्टेकट्टे व निरोगी र तुमच्या जवळ असणारे सुद्धां धटेकट्टे व निरोगी होऊ शकतील. तसेच तुझी जर अजारी व अशक्त असाल, तर I पाताल, तुमची आरोग्याची लहरच जणूं काय तुहीं दुसऱ्याच्या शरीरांत हाइल, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास आरोग्य करण्याचा प्रयत्न कराल, तर पहिले काम हें की फक्त आपली आरोग्यता त्यांत घालावी. निरोगा होण्याचा पहिला प्रकार हा आहे. जाणन ह्मणा, किंवा न जाणून ह्मणा, आसोयनेची अदलाबदल करता येते अतिशय सशक्त मनुष्य जर सहवासाला राहील, तर तो पहिल्यापेक्षां सशक्त होईल. मग ते त्याला कळो वा न कळो. कळून होईल तर, ती क्रिया लौकर आणि विशेष चांगली होईल. आणखी दुसरा एक प्रकार आहे. त्यामध्ये एखादा मनुष्य स्वतः मोठा धट्टाकट्टा असतो असे नाही. तरी तो दुसऱ्याची प्रकृति चांगली आरोग्य करीत असलेला आपण पहातो. असे असते तेव्हां पहिल्या मनुष्याची प्राणावर सत्ता अधिक असते, ह्मणून तो त्या वेळी आपल्या प्राणाला ह्या विवक्षित हलकाव्याच्या स्थितीपर्यंत आणतो, आणि मग ती स्थिती तो दुसऱ्याला देतो.