या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. कितीएक प्रयोग असेही झालेले आहेत की, ते बऱ्याच अंतरावरून होतात. कारण, मध्ये मुळीच खंड नसल्यामुळे अंतर असून नसल्यासारखेच होते. खंड पडलेलें असें अंतर आहे कोठे १ सूर्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही खंड-तूट आहे काय ? जडतत्त्वाची भली मोठी एक रास आहे. तिच्या एका टोकाला सूर्य आहे, आणि दुसऱ्या टोकाला तुही आहां. नदीच्या एका भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये कधीं खंड असतो काय ? मग एखाद्या शक्तीने तरी प्रवास कां करूं नये ? तसे होण्याला विरुद्ध प्रमाण काही दिसत नाही. हा प्राण पाहिजे तितक्या अंतरावरून प्रवास करूं शकतो, ह्या गोष्टी अगदी सत्य आहेत. पण एक गोष्ट खरी असल्यास त्यांत शेकडो खोट्या असतात, ही गोष्ट जितकी सोपी वाटते, तितकी सोपी नाही; बरे करण्याच्या प्रकारामध्ये हे दिसून येतें की, बरें करणारे लोक नेहमी स्वाभाविक शरीरस्वास्थ्याचा फायदा घेतात. जगामध्ये असा कोणताही रोग नाही की, जो दरोबस्त मनुष्यांचा फडशा पाडील. महामारीसारख्या सांतीमध्ये सुद्धा प्रथम प्रथम शेकडा ६० मरतात. मग तें मान कमी होत होत ३०।२० वर येऊन बसते, आणि बाकीचे बरे होतात. एखादा आलोपाथिक डाक्टर येऊन त्याला पाहतो; आणि तो त्यास आपलें औषध देतो. होमोपाथिक येतो, आणि तो आपलें देतो, आणि तो पुष्कळांस सहज बरें करतो. कारण, होमोपाथिक पद्धत ही रोग्याची ढवळाढवळ करीत नाही. तर त्याला स्वाभाविक रीत्या बरे होऊ देते. तसेंच श्रद्धा उत्पन्न करून बरा करणारा त्याहूनही पुष्कळांस बरें करील. तो ते सोसण्याला मनाला अधिक शक्ति देईल, आणि रोग्यामध्ये गुप्त असलेला प्राण, श्रद्धेच्या द्वारानें उन्नतीस येईल, परंतु श्रद्धा बसवून बरे करणारे लोक नेहमी एक चूक करीत असतात. त्यांना असे वाटते की, विश्वास हाच स्वतः मनुष्याला बरे करतो. त्याच्या एकट्याने सारे काम झेंपत नाही. काही रोगांची लक्षणे अतिशय वाइट असतात. ती ही की, रोग्याला तो रोग झाला आहे असे वाटतच नाही. अशी दृढतर रोग्याची श्रद्धा हाच एक रोग व हीच बहुतकरून लवकर मृत्यूची सूचना असते. अशा प्रसंगी श्रद्धेच्या योगाने गुण येत नाही. अशा सर्व प्रसंगांतूनही आपण पार पडूं अशी श्रद्धा उत्पन्न होईल तर, रोगीही बरे होतील. हे सर्व ह्या प्राणाने होऊन खरा गुण प्राप्त होतो. ह्या प्राणावर सत्ता करणाऱ्या पवित्र मनुष्याला त्यास एका विवक्षित हेलकाव्यांत आणतां येते; आणि त्याला तेच हेलकावे दुसऱ्यांत उत्पन्न करून दुसन्यांत पोचविता येतो. ही गोष्ट रोजच्या