या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. क्रियेमध्येही आपल्यास दृष्टिगोचर होते. मी तुमच्याशी बोलत असतो तेव्हां मी कोण ह्मणजे मी खरोखर काय करीत असतो? असें झटले तर चालेल की, माझें मन एका विवक्षित हेलकाव्यांत मी आणतो, आणि, त्या स्थितीत आणण्यांत जितकें अधिक मला यश मिळेल, तितका मी ह्मणतो त्याचा गुण तुह्मांवर अधिक होईल. आपणां सर्वांस माहित आहे की, मी ज्या दिवशी अधिक आवेशांत येईन, त्या दिवशी तुझांला अधिक आनंद होईल आणि मी जेव्हां कमी आवेशांत असेन, तेव्हां तितकी तुझांस मजा वाटणार नाही. - इच्छामात्रेकरून जगाची घडामोड करणारे असे महात्मे झणजे जगांतील मोठमोठ्या इच्छाशक्तीच होत. ह्यांना आपले प्राण अत्युच्च तन्हेच्या हेलकाव्या आणण्याची शक्ती असते; आणि ती इतकी विशाळ आणि बलवत्तर असते ता एका क्षणांत दुसऱ्यालाही कबजांत आणते. तिच्याकडे हजारों प्राण माढल जातात, आणि अर्धे जग ते जे काय करतात, त्याचा विचार करीत राहते. जगांतील मोठमोठ्या भविष्यवाद्यांना प्राणावर सत्ता चालविण्याची अ. " असते. ती त्यांना विलक्षण इच्छाशक्तीपासून प्राप्त होते. त्यांनी लाप्राण गतीच्या उच्चस्थितीला आणलेला असतो. सर्व जगावर अंमल करण्याची जी शक्ति दिलेली असते ती हीच, शक्तींची सर्व स्वरूपें ह्याच सत्ते न उत्पन्न होतात. त्यांतल्या गुरुकिल्लया मनुष्यांस समजत नाहीत; पण ह्याशिवाय दुसऱ्या कोणतेही रीतीने वर लिहिलेल्या गोष्टींचा उलगडा होत नाही. या तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये प्राणांचा पुरवठा कमी किंवा अधिक होती आणि समतोलपणा बिघडतो. हा प्राणांचा समतोलपणा ढळला की, ज्यास रोग झणतों तो उद्भवतो. त्या ठिकाणाचा अधिक झालेला प्राण कमा कला, किंवा कमी असेल तेथे नवा सामील केला झणजे रोग बरा होतो. राताल कोणत्या भागावर प्राण प्रमाणाबाहेर जास्त किंवा कमी झाला आहे हे जाणण ह्याचंच नांव प्राणायाम. या वेळी ज्ञान हे इतकें सूक्ष्म होते की, मनाला, एखाद्या पायाच्या किंवा हाताच्या बोटावर प्राण कमी आहे की अधिक आहे, हे सुद्धा समजतें, आणि तेथे कमजास्ती पुरवठा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. प्राणायामांतील अनेक गुणांपैकी हेही गुण होत ते क्रमाक्रमाने आणि हळू हळू शिकले पाहिजेत. खरोखर, साऱ्या राजयोगाचा मुख्य उद्देश हा की, प्राणाच्या निरनिराळ्या पायऱ्यांतील भेद आणि त्यावर सत्ता करण्यास शिकविणे. आपण