या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९८. एखाद्या मनुष्याने आपल्या शक्ती एकत्र केल्या की तो आपल्या देहांतील प्राणांचा धनी होतो. जो मनुष्य ध्यान करतो, तोही प्राण एकत्र करूं शकतो. समुद्राच्या मध्यावर पर्वतासारख्या मोठमोठ्या लाटा असतात. पुढे पुढे लहान लहान लाटा असतात, आणि त्याच्यापुढे त्याहून लहान होत होत, अगदी सूक्ष्म बुडबुडे झालेले असतात; पण त्या सर्वांना आश्रय एकच अफाट समुद्र. बुडबुडा हा अफाट समुद्राच्या एका टोकाला जोडलेला असतो, आणि मोठी लाट दुसऱ्या बाजूला जोडलेली असते. त्याप्रमाणे एखादा मोठा भव्य मनुष्य असू द्या, आणि दुसरा अगदी लहान बुडबुडा असू द्या. तरी ते प्रत्येक अफाट चैतन्यसागराला जोडलेलेच आहेत. आणि हाच हक्क जन्मतःच प्रत्येक प्राण्याला मिळालेला आहे. जेथे जेथें ह्मणून जन्म आहे, तेथे तेथे त्याच्या भोंवती अफाट चैतन्याचे कोठार भरलेलें आहेच. कांही परमाणू-अगदी सूक्ष्मफक्त सूक्ष्मदर्शक यंत्रानेच दिसणारे असे बारिक बारिक बुडबुडे, त्या अफाट चैतन्यसागरांतून सारखे ओढीत, व पहिला आकार बदलीत बदलीत कालांतराने वनस्पति, मग जनावर, मग मनुष्य आणि सरतेशेवटीं परमेश्वर बनतात. हे प्राप्त व्हावयाला लक्षावधि युगे लागतात; पण युगें ह्मणजे तरी काय ? वेग वाढविला: हालचाल वाढविली; ह्मणजे कालाचे अंतर जोडतां येतें. योगी ह्मणतो की, साहजिक जी गोष्ट व्हावयाला दीर्घ काल लागतो, तो क्रियेच्या झपाट्याने कमी करता येतो. एखादा मनुष्य ब्रह्मांडांत अस्तित्वात असलेलें अफाट जडत्वसमुद्रांतील हे चैतन्य हळू हळू आकर्षण करीत करीत जाऊ लागला तर, देव व्हावयाला कदाचित् शेकडो हजारों वर्षे लागतील; आणि त्याची वरची पायरी होण्याला ५०० सहस्र वर्षे लागतील; आणि पूर्णत्वास पोचण्याला कदाचित् ५० लक्ष वर्षेही लागतील. पण त्याचीच वाढ केली तर, हा काल कमी होऊन जाईल मग पाहिजे तितका प्रयत्न केला तर, तीच परिपूर्णता सहा महिन्यांत किंवा सहा वर्षांत प्राप्त होण्याचा संभव कां असू नये ? त्याला काही मोजमाप नाही. तें विचाराने समजतें. एखादें एंजिन अमुक कोळसे घातले असतां, तासांत दोन मैल जाते, तर त्यांत आणखी कोळसा घातला तर त्याहून लौकर जाईल. तशाच रीतीने आत्मा तरी आपली क्रिया वाढवून ह्याच जन्मांत तरी तेवढा पल्ला कां न गांठील ? सरतेशेवटी एकूनएक प्राणी ती परिपूर्णता मिळविणार हे आह्मांस माहित आहे. पण ही लक्षावधि युगे वाट पहात बसणार कोण; तें तत्काल,