या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. ह्याच देहांत, ह्याच मनुष्ययोनीत कां मिळू नये ? तें अपार ज्ञान, आणि अगाध शक्ति आतांच का आह्मांस मिळू नये ? योग्याच्या दृष्टीने जन्माचे सार्थक्य काय तें हेंच, व साऱ्या योगशास्त्राचा रोख ह्याकडेच आहे. आणि योगशास्त्र हेच शिकवितें कीं, शक्ती वाढवून काल कमी कसा करावा, सदृश होण्याची शक्ति कशी वाढवावी, आणि तेणेकरून हळू हळू ह्या टोंकापासून त्या टोकास जाईपर्यंत आणि सर्व मनुष्यजातीबरोबर आपण परिपूर्ण होण्याची वाट पाहण्याऐवजी परिपूर्णतेस पोचण्याचा वेळ कमी करतें. प्राचीन कालचे मोठमोठाले सारे भविष्यवादी, योगी, आणि साधु हे कोण ? मनुष्यपणामध्ये राहणारे जे त्यांचे वीतभर आयुष्य, तेवढ्यांत साधारण साधारण मनुष्याला परिपूर्ण स्थितीला पोचण्याला जो दीर्घ काल लागावयाचा, तो ते नाहीसा करून टाकतात. ह्या जन्मांतच ते स्वतः परिपूर्ण असतात; त्यांना दुसरा कसलाही विचार नसतो. दुसऱ्या कशाकरितांही त्यांना जगावयाचे नसते. दुसरी कल्पना मनांत आणण्याकरितां एक क्षणही प्राण धरावयाचा नसतो. अशा प्रकारे आपला मुक्काम जवळ आणतात. एकाग्रता केल्याने, सदृशता किंवा क्रिया वाढावल्याने अशा प्रकारे रस्ता आखूड होतो, आणि एकाग्रतेने शक्ति कशी प्राप्त करून घ्यावी, हे राजयोग आपणांस शिकवितो. पुढे चालू. गाइस नमुनि रोज तप साखर सातु चारा. तुज दु:ख काय चुकते? वेग दे. चिनि गाणे मारु, दिवे वात लावा. ह्या वाक्यांतील हवी ती अक्षरें मागेपुढे करून मोरोपंतांची एक प्रसिद्ध आर्या करा. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.