या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. लेल्या होत्या की, सांप्रत सर्व युरोप खंडांत पसरलेल्या सर्व विद्यांचा व कलांचा पाया तोच आहे. त्यांचीच विद्या हल्ली युरोपांतील मुलांस शिकविली जाते; आणि प्रौढ मनुष्यास ती पाहून आनंद होतो. त्यांचे देव कवींना काव्ये करावयाला विषय होतात. त्यांची वर्णने, इतिहास, इमारती ही लेखकांचे, वक्त्यांचे आणि कुशल लोकांचे साहित्य करतात. त्यांच्या खेळांचे नियम हीच मूळ नाटकाची रचना आहे. तेथाल तत्वज्ञान तर परिपक्क दशेस आलेले होते. त्यांच्या चित्रकलेची कामें हल्ली फारशी उपलब्ध नाहींत. तरी, जी काही थोडाबहुत मा ढळतात, ती पाहून हल्लींचे युरोपांतील सुधारलेले शिल्पशास्त्रज्ञही तोंडांत बोट घालतात. ____मग होड्स बेटावरील लोकांची कामें काय विचारावीत? ते लोक इतके शहाणे व कशल होते की त्याची कल्पना होणे सुद्धा असर आहे. त्यांचे दर्यावर्दीपणाचे नियम इतके उत्तम होत का, त्याला कांहीं कांहींच गोष्टी घेऊन रोमन लोक राहिले नाहीत; तर, त्यान त्या कामांत त्यांचे दोबस्त अनकरण केले. आणि अवाचानला भाचाच कित्ता वळविला. ह्या संस्थानची वसाहत सुमारे वीस मैलांची असून त्यातील बऱ्याच भागांत व्यापारी लोक राहत असल्यामुळे, तेवढा प्रदेश त्यांनी आपल्या सोयीप्रमाणेच तयार केला होता. बंदर सुद्धा सर्व समुद्रांतील बंदरांपेक्षां सोयीचें व उंचे होते. त्याचा आ सरदान शिगे एकत्र मिळाल्याप्रमाणे असल्यामुळे, त्याचे उत्तम प्रकारे संरक्षण होत असे. व्यापारामध्ये त्यांची किफायतही फार मोठी होती. ह्यामुळे तेथील कार सुखी असत. पण तत्कालीन' श्रीमंत लोकांस निष्काळजी राहण्याचे काम मात्र मोठे कठीण होतें. ह्या एकोणिसाव्या शतकाप्रमाणे मात्र त्या वेळेची स्थिति नव्हती. लढाया, लुटी, दरोडे ह्या तुफानांत नेहमी गटकळ्या खाव्या लागत. त्या वेळेचा असा एक लेख आढळतो की, डिमेट्रियस ह्याने ह्या होड्स लोकांवर हल्ला करून पुष्कळ दिवस त्राहित्राहि करून सोडले होते. तत्प्रीत्यर्थ अगणित द्रव्य खर्ची पडलें, व उभय पक्षांकडेही मनस्वी रक्तपात झाले. त्या संकटसमयीं गरीब अनाथ लोकांस बचावण्याच्या कामी तेथील श्रीमान् लोकांनी