या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ आलेला फार होता. प्रना कारागिरांकल खरे; पण अंक ५ वा. मे १८९८. बहुत औदार्य दाखविले. त्याची स्थीरस्थावर झाल्यानंतर पुतळे करण्याचा परिपाठ सुरू झाला, व गुणी मनुष्यांची चहा होऊ लागली. ह्या बंदराच्या आकाराच्या सोयीचे आह्मीं वर्णन केलें खरें; पण हा आकार खाभाविकापेक्षा त्यांनी कारागिरांकडून कृत्रिम रीतीनेच आणलेला फार होता. प्रथम हे दोन खाडीचे फाटे इतके जवळ जवळ आलेले होते की, त्यांतून गलबत जाण्याची सुद्धां मारामार पडे. त्याची सर्व त्यांनी दुरुस्ती केली. ह्याप्रमाणे सर्व स्वस्थता होऊन लोक सुखानें नांदूं लागले, तेव्हां लोकांस पुतळे करण्याचा नाद लागला. त्या काली तेथे ३००० शोभायमान मूर्ति व १०० च्यावर मोठमोठाले पुतळे तयार झाले असे सांगतात. ह्याच वेळी ह्मणजे इ. स. पूर्वी २४४ व्या वर्षी होड्स नांवाचा वरील अवाढव्य पुतळा करण्याची कल्पना त्यांच्या मनांत आली. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो उभारून जगांतील सप्तचमत्कारांस भर घातली. हा पुतळा तयार करण्यास जो शिल्पी नेमला होता, त्याचे नांव चार्लस. हा लिंडस येथील राहणारा. हे शहर त्या वेळी फार प्रख्यात होते. हा लिसिप्पस ह्मणून जो प्रसिद्ध विद्वान् होता, त्याचा विद्यार्थी. ह्याच्या बुद्धिकौशल्याचे दुसरे कोणतेही काम उपलब्ध नाही. तरी ह्या एका कामावरूनही त्याच्या बुद्धिमत्तेची सहज कल्पना होते. हा पतळा त्यांच्यांतील अपोलो देवासारखा होता. पण त्याचा आकार फारच अवाढव्य ! ग्रीस लोकांच्या देवतांची जी लक्षणे सांगितलेली आहेत, तितक्या लक्षणांनी तो युक्त होता. खाडीच्या तोंडावर दोहोकडे झणजे दोन्ही तीरांवर दोन पाय ठेवून त्यास उभे केले होते. आकाराने हा पुतळा जरी इतका विशाळ होता तरी, त्याच्यांतील अवयव अगदी यथाप्रमाण-केवळ रेखल्यासारखे-होते. त्याची अजस्र छाया, समुद्रांतील पाण्यावर एखाद्या प्रचंड राक्षसासारखी कितीतरी मैल लांब पडत असे. ह्या पुतळ्याच्या पाठीवर धनुष्य बांधलेले होते. डाव्या हातांत पिसारा लावलेला एक बाण होता, व उजव्या हातांत पेटलेली एक धुपार्ती होती. त्याच्या मस्तकांवर सुंदर जटा पसरलेल्या असून गिरिशिखरावर सूर्यकिरण पसरल्याप्रमाणे पाकळ्या विस्तारलेल्या होत्या. हा पुतळा उत्तम जातीच्या पितळेचे पत्रेपत्रे जोडून पो