या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. कळ तयार केला होता. ह्याची पायापासून मस्तकापर्यंत उंची १०५ फूट होती! त्याच्या दोन्ही पायांतून शिडें न उतरतां, खुशाल गलबतें जात येत असत. ह्या पुतळ्याला सुमारे ७००००० रुपयांचें नुसते पितळ लागले! आणि आरंभ केल्यापासून ते सर्व काम शेवटास जावयाला बारा वर्षे लागली. ह्या पुतळ्याच्या उंचीचें साधारण अनुमान ह्मणजे त्याच्या पुढे मुं. बईतील मोठमोठाल्या इमारती सुद्धां कांहीं नव्हेत. ह्यावरून होड्स बेटावरील अपोलोची कल्पना करावी. हा पुतळा आंतून पोकळ असून त्यांत वर चढण्यासाठी जिना केलेला होता. त्यावरून त्याच्या मस्तकावरही जातां येत असे. त्याच्या गळ्याभोंवतीं आरसे बांधलेले होते. त्यांतून सूर्याचे किरण फार दूरदूर अंतरावर परावर्तन होत, आणि लांबीच्या गलबतासही ह्या पुतळ्याचा बोध होत असे. ह्यास उभारून छप्पन्न वर्षेही झाली नाहीत, तोंच मोठा भूकंप होऊन हा पुतळा उलथून पडला. आणि पुष्कळ अवयव मोडून छिन्नभिन्न झाले. तरी ९०० वर्षे त्याच स्थितीत तो होता. तेव्हां त्याच्या हातापायांतून जाणे ही सुद्धा पहाणारांस करमणूक होत असे. त्याच्या पायाचा एक आंगठा मोडला होता. ती एक मोठी गुहाच आहे असें वाटे. आणि त्यांत दगडाचे व मातीचे ढीग पडलेले दिसत. नंतर रोमन लोकांनी होड्स बेट जेव्हां आपल्या ताब्यात घेतले, तेव्हां मोडतोड होऊन राहिलेल्या पुतळ्याचे वजन ७२०००० पौंड होते. तें ओढिसाच्या एका यहुदी व्यापाऱ्याने ३६००० पौंडांला विकत घेतले. मध्यंतरी हा पुतळा दुरुस्त करण्याचे तेथील रहिवाशांनी मनांत आणून रक्कमही जमविली होती. परंतु ती लफंग्या मनुष्याच्या हातांत पडल्यामुळे तो बेत रहित झाला. आणि तो मोडतोड झालेला पुतळा शेवटी, वर सांगितलेल्या यहुदी व्यापाऱ्यास विकावा लागला. ते सर्व पितळ नेण्यास, ह्या व्यापाऱ्यास ९९० उंटें लागली!!! अशा ह्या अकटोविकट कामापुढे हल्लींची ही तखलोपी कामें काय होत?