पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/२८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालून दिला आहे.

 उद्योगाचे गणित असे :-

 आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे जुने तंत्रज्ञान मागे पडत आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी. उद्योगामध्ये नाविन्यता असायला हवी याचीही सुनीलला जाण आहे. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू आहेत. वर्कशॉपबरोबरच त्याने हार्डवेअरचे छोटे दुकानही सुरू केले आहे. दरमहा १०,००० ते १२,००० निव्वळ नफा होतो. सरकारी योजना गावपातळीवर पोहचायला हव्यात असे सुनिलना वाटते. आपल्या या उद्योगामध्ये त्यांना अनेक बरे-वाईट अनुभव आले. कामाची आवड, कष्टाची प्रवृत्ती आणि निर्णयक्षमता या गोष्टी उद्योगाच्या यशासाठी सुनीलना महत्त्वपूर्ण वाटतात. या उद्योगाबरोबरच ट्रेडिंगचा उद्योग करण्याचाही त्याचा विचार आहे.

***

 नित्य नवे शिकेल. तोच स्पर्धेत टिकेल   ११

 नाव :- रामचंद्र हरीभाऊ घोगरे

 राहणार :- रांझे, ता. भोर, जि. पुणे.

 शिक्षण :- डी. एम्. ई.

 वय :- ३०

 व्यवसाय :- युनिटेक इंजिनिअर्स अँँड सर्विसेस

 शिक्षणाची ओढ :-

 शेतीवर उपजिविका करून जगणारं रामचंद्र यांचं कुटुंब. घरामध्ये एकही व्यक्ती शिकलेली नसताना मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे कोल्हापूरला जाऊन त्यांनी डी.एम.ई. ची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या यंत्रशाळेतील सर्व विभागांमध्ये काम केले. विविध ठिकाणची माहिती आणि अनुभव त्यांनी घेतला. त्या अनुभवातून प्रबोधिनीच्या सहकार्याने त्यांनी

नोकरीच्या मृगजळाऐवजी स्वयंरोजगार बरा.    २३