पान:केशवसुत यांची कविता.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केशवसुतांची कविता.

कोणी गवाक्षी निज दृष्टि फेकी,

नीवी त्वरेर्ने फिटली तिचे की,

हस्ते निऱ्या आकळुनीच ठाके,

नाभीत तत्कङ्कणकान्ति फाके!


अन्या त्वरेनें उठली पहावया,

लागे पदाच्या स्खलनीं गळावया

ती ओविती जी पुरती न मेखला,

अंगुष्ठमूली गुणमात्र राहिला!


लोलाक्ष हे भ्रमर ज्यांवरि शोभतात,

आहेहि आसवसुवास भरून ज्यांत,

त्या त्यांचिया सुवदनी खिडक्या भरूनी

गेल्या-जणू सजविल्याच सरोरुहांनी !

रघुवंशे श्रीकालिदास:

नोवेंबर,१८८५.


              [२]
              
              
         उगवत असलेल्या सूर्यास. 
               श्लोक 
उदयगिरिशिरीं या त्वत्तुरंगी खुरांहीं 

तुडवुनि उडवीली धूलि ही जैशि कांहीं!—

द्युति बघुनि अशी ती चित्त माझें रमून,

दिनकर! मज बोधी तूज गाया नमून! 


नव सुरुचिर वल्ली या हिमस्नात यांनी,

नव रुचिर लतांनी या हिमालंकृतांनी,

स्मितसम सुमनांनी पुजिता तूज आता, 

फिरुनि फिरुनि भास्वन् ! वन्दितों तूज गातां.