पान:केशवसुत यांची कविता.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिंदे होळकर.

गमे तूतें ध्याया मज न दुसरी आकृति बरी,

रतीचे वेळीच्या शिरति हृदयीं अन्यहि जरी;

म्हणूनीयां वाटे मज अनुभवें याच सखये,——

सुखाहूनी दु:खा स्मरति बहुधा बद्ध हृदयें! ४


अहा! अंकीं माझे तुज बघतसें मी बसलिस,

शिरा स्कंधी माझे लववुनि गडे तूं पडलिस,

वियोगाचे तर्के रडत असतां, अश्रु सुदती!

तुझे,माझ्या वक्षीं टपटप बघें मी उतरती! ५


टिपाया मी त्यांतें, पदर सरसावी परि गडे,

भिजोनी तो तूझे नयन सुकणें, हें नच घडे;——

असें कां व्हावें हें न कळुनि रडें मी खळखळा,

पुसाया तैं लागे अहह! नयनां तोच मजला! ६


जुलै, १८८६


                 [५]
                 
        जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर 
        
                श्लोक 
 ज्यानीं बाहुबलें रणांत सगळे जिंकुनियां हो अरि 
  
 कीर्तीचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
  
 त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनियां चालतां 
 
 खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?     १
 
 राणोजी——परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फूरे,
 
 मल्हारी——परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फूरे,
 
 हा! हा! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना!
 
 हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!     २
 
 जुलै, १८८६