पान:केशवाचार्यादिकृत महिकावतीची उर्फ माहीमची बखर.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) -साथ सिद्ध, परिस्थितिसिद्ध व अन्नसिद्ध मनोरचना इतकी मुक्तद्वारी, तुटक व स्वयंपूर्ण बनलेली असे की देशी किंवा परदेशी कोणते च सरकार त्याला मना पासून नको असे. ३९. सरकार नांवाच्या कृत्रिम, उपटसुंभ, चोरट्या व जुलमी संस्थे संबंधानें गांवकरी जर इतका पराकाष्ठेचा उदासीन असे, तर असा प्रश्न उत्पन्न होतो की, येणारें नवें सरकार व जाणारे जुने सरकार त्यांच्या मधील युद्धे, तंटे, मारामाच्या व झटापदी कोण खेळे ? हिंदुस्थानचा राजकीय इतिहास ऊर्फ सरकारांचा इतिहास तर अथ पासून इतिपर्यंत मारा- मान्यांनी तुडुंब भरलेला आहे. ह्या मारामाऱ्या कोण करी ? मृत सरकारा बद्दल कोण रडे ? आणि नव्या सरकाराची जयंती कोण करो ? ह्या प्रश्नाचे उत्तर असें आहे की, ज्या मूठभर उपटसुंभांनी सरकार स्थापिलें ते मूठभर लोक जुन्या सरकाराच्या वतीने नव्या सरकाराशी झुंजत, तंडत व पराभूत झाले असतां रडत आणि विजयी झाले असतां खिदळत. हिंदुस्थानांत सरकार ही संस्था सदा कांहीं अत्यल्पसंख्याकांची असे, सार्वलौकिक कधीं हि नसे. एवढे मोठे मोंगलांचे साम्राज्य; परंतु त्यांतील मुख्य घटकावयांची संख्या राजघराण्यांतील पुरुषांच्या संख्ये हून म्हणजे पांच पंचवीस राजपुरुषांहून जास्त नसे, कमाल ओढाताण केली तर साम्राज्यांतील मुलकी व लष्करी सुभे व नायबसुभे मिळून दीड दोन हजारांहून जास्त नसे. हे दीड दोन हजार लोक मोगल साम्राज्या करितां लढत, तंडत, मरत व रडत. बाकीच्या कोट्यवधि हिंदवासीयांना मोंगल, मराठा, पोर्तुगीज इत्यादि सर्व एका च दर्जाचे चोर भासत. तात्पर्य, हिंदुस्थानांत होऊन गेलेली सर्व सरकारें मूठभर अल्पसंख्याकांची आहेत व ह्या मूठभर अल्पसंख्याकांचं सरकार त्यांच्या च सारख्या इतर मूठभर परंतु समवल किंवा वरचढवल अल्पसंख्याक सरकाराच्या ऊर्फ टोळीच्या हातून नाश पावतें. त्यांत गांवकऱ्याचा हात शपथेला सुद्धा नसतो. एतत्संबंधाने अनेक ऐतिहासिक उदाहरणांतून एक अत्यन्त ठळक असे उदाहरण येथे नमूद करतों व तें मराठयांच्या इतिहासांतले घेतों. शिवकालीं मराठे व मुसुलमान ह्यांच्या मध्ये घनघोर झगडा सुरू होता, अशी भाषा वापरलेली सामान्य इतिहासांतून आढळते. त्या भाषेत कितपत तथ्य आहे तें पाहूं. शिवाजीच्या बाजूला एकोन एक सर्व मराठे होते असें म्हणतां येत नाहीं. महाराष्ट्रांतील सर्व मराठ्यां पैकी शेकडा नव्वद मराठे अव- रंगझेबाचं प्रजाजन होते व त्यां पैकीं कांहीं त्याचे सैनिक होते. मुसुलमानां पैकी शेकडों लोक शिवाजीचे प्रजाजन होते व कांहीं त्याच्या सैन्यांत होत. तेव्हां शिवाजी व अवरंगझेब यांच्यांत जीं युद्धे झाली त्यांना मराठे व मुसुमान ह्या दोन लोकां मधील युद्धे म्हणणें इतिहासाला धरून नाहीं. हीं लोकां लोकां मधील युद्धे नव्हती. हीं दोन्ही बाजूच्या अल्पसंख्याक राज्यकर्त्यांची म्हणजे सरकारांची युद्धे होती. हि कडे ढुंकून सुद्धां पहात नसे. तो केवळ उदासीन घेण्याच्या किंवा त्याचे औदासीन्य घालविण्याचा किंवा त्याला शिक्षण देण्याचा किंवा त्याला राजकीय उपदेश पाजण्याचा खटाटोप करण्याची जरूर नव्हती. सामान्य गांवकरी ह्या दोघां असल्या मुळे, त्याची संमती त्याला सरकारें