पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला? । १३७

लोकांना अपवित्र व अस्पर्श मानणे याहून मनुष्याच्या विचारीपणास लांछनास्पद अशी दुसरी गोष्ट नाही. "न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठगतैरपि" एवढा ज्या महंमदीयांविषयी आम्हांस तिरस्कार होता, त्या गोहत्या करणाऱ्या म्लेंछांचे व तत्समान युरोपियनांचें, राज्याधिकारांमुळे आम्हांस कांहीच वाटेनासें होऊन, ज्यांना वैदिक धर्म शिरसावंद्य, ज्यांचा धर्म व आचार हिंदु, जे अनादि कालापासून हिंदुस्थानचे रहिवासी, ज्यांच्या हातून गोवध होत नाही. अशा हिंदूंचा आम्ही तिरस्कार करतों, त्यांना स्पर्श करण्यास भितों आणि त्यांहून अनेक कारणांमुळे अस्पर्श अशा परकीयांस दृढालिंगन देतों, हा केवढा प्रमाद होय?"
 अशा तऱ्हेची टीका जागोजाग करून आगरकरांनी हें दाखवून दिले आहे की, हिंदूंमधील जातिभेद, अस्पृश्यता व तज्जन्य विषमता ही इतिहास, तर्क, समाजहितदृष्टि यांपैकी कोणत्याहि दृष्टीने पाहिलें तरी समर्थनीय ठरत नाही. समाज-प्रगतीच्या दृष्टीने पाहिलें, तर तें हिंदु समाजाचें घोर पापच आहे.
राजकीय शिलावस्था
 केवळ धार्मिक व सामाजिक जीवनांतच आम्हांला शिलावस्था आली आहे असें नाही. राजकीय जीवनांतहि आमची तीच स्थिति आहे; आणि त्याचें कारण हे की, आज हजारो वर्षे या देशांत अनियंत्रित राजसत्तेवांचून, दुसरी शासनपद्धति माहीतच नाही. "राजा कालस्य कारणम्"- ही आमची श्रद्धा. राजा आई, राजा बाप, राजा करील ती पूर्व दिशा, लोक राजाचे गुलाम या आमच्या राजकीय कल्पना रामराज्यापासून आजपर्यंत जशाच्या तशा कायम आहेत. आगरकर म्हणतात, "ज्याला याचें प्रत्यंतर पाहिजे असेल त्याने बडोदें, लष्कर (ग्वाल्हेर), हैदराबाद, म्हैसूर वगैरे पाहिजे त्या नेटिव संस्थानाची फेरी करून तेथील जुन्या पद्धतीच्या लोकांचे विचार व आचार कसे आहेत याची बारकाईने चौकशी करावी. त्या संस्थानच्या शास्त्यांपैकी एखाद्याने आपल्या प्रजेपैकी एखाद्याला केवळ चैनीखातर चाबकाचा खरपूस मार दिला, अथवा राखेचा तोबरा चढवून पाठीवर भला मोठा दगड दिला, किंवा प्रसंगविशेषीं एखाद्याचे नाही तसले हाल करून खूनहि केला, तरी देखील भोगणाऱ्याचे आप्त किंवा इतर लोक आपल्या स्वामीविरुद्ध उठावयाचे नाहीत. ही आमची राजभक्ति आणि राजनिष्ठा! धिक्कार असो आम्हांला! आमच्या राजभक्तांनी परक्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या देशांत येऊ दिल्या आणि एकाच्या जुलमाचें जूं निघालें नाही तोंच दुसऱ्याच्या जुलमाचें जूं मानेवर घेतलें, आणि आपल्या बायकापोरांसह, शतकेंच्या शतकें हवे तसले हाल सोशीत हीन दास्यावस्थेत काढली, यांत नवल तें काय?" (आमचे दोष आम्हांस केव्हा दिसू लागतील?)
 हे धिक्काराचे उद्गार वरील निबंधाच्या शेवटी शेवटीं आले आहेत. त्या आधी, "गेल्या दोन हजार वर्षांत आम्ही जीवरक्षणापलीकडे कांही केलें नाही, आणि अशाच स्थितींत पुढील युगें लोटावयाची असतील, तर आम्ही एकदम नाहीसें