हिंदु-मुस्लिम वाद । ३०७
प्रतिकार
आणि ही भयानक आपत्ति पाहूनच टिळकांनी तिला तोंड देण्यासाठी लेखणी उचलली. १८९३ आणि १८९४ ह्या दोन वर्षांत ते सारखे या विषयावर लेख लिहीत होते व सरकारी धोरणावर, अन्याय, पक्षपात, जुलूम यांवर टीका करीत होते. एका लेखांत तर, हा दंगा मुस्लिमांचा नसून पोलिसांचा आहे, असें स्पष्टपणें त्यांनी लिहिलें, आणि दर वेळीं अनेक पुरावे देऊन, कांही प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांच्या भाषणांचे आधार देऊन, दंग्याला प्रारंभ मुस्लिमांनी केला, पोलिसांनी त्यांना साह्य केलें आणि वरिष्ठ अधिकारी साळसूदपणें हिंदूंनाच उपदेश करीत आहेत, हें सिद्ध करून दिलें.
याबरोबरच दुसरी एक गोष्ट ते सारखी सांगत. ती ही की, आता हिंदूंनी आत्मसंरक्षणासाठी सिद्ध झालें पाहिजे. सरकार तुमचें रक्षण करणार नाही, तेव्हा तुम्हींच एकजूट करून प्रतिकार केला पाहिजे, त्यावांचून दुसरा तरणोपाय नाही, असें प्रतिपादन त्यांनी सतत चालू ठेवलें होतें. याचाच परिणाम होऊन मुंबईला व पुण्याला हिंदूंनी उत्तम प्रतिकार करून दंग्यांना आळा घातला. एका खटल्यांत सेशन्स जज्ज जेकब यांनी खरा न्याय दिला. हिंदूंच्यावरचे आरोप मुळीच सिद्ध होत नाहीत, असे सांगून त्यांना सोडून दिलें व पोलिसांवर टीका केली. धुळ्याला कलेक्टरच्या देखतच, सरकारी हुकूम न मानतां मुस्लिमांनी अत्याचारास प्रारंभ केला. तेव्हा त्यानेहि हिंदूंचा पक्ष घेतला. टिळकांनी या दोघांनाहि धान्यवाद देऊन, त्यांच्या आधारें आपल्या प्रतिपादनाची सत्यता सिद्ध केली. सरकारच्या स्वार्थी भेदनीतीचें व मुस्लिम अत्याचारांचें स्वरूप उघड करून टिळकांनी प्रतिकाराचा संदेश दिला नसता, व प्रतिकार करणाऱ्या हिंदूंचे वेळोवेळीं समर्थन केलें नसतें, तर महाराष्ट्रांत हिंदूंना जगणेंहि कठीण झालें असतें.
इतिहासाची जाणीव
हिंदूंना प्रतिकाराची प्रेरणा देतांना लो. टिळक आणखी एक विचार पुनः पुन्हा मांडीत असत. इंग्रज लोक मुस्लिमांस जवळ करतांना त्यांस नेहमी सांगत की, "आम्ही येण्यापूर्वी तुम्ही येथले राज्यकर्ते होता, हिंदूंना तुम्हीं जिंकलें होतें. तेव्हा तुम्ही हिंदूंपेक्षा जास्त पराक्रमी आहा." हें सांगण्याचा हेतु उघड आहे. तुम्ही हिंदूंचें सहज निर्दाळण करूं शकाल, अशी चिथावणी यांत आहे. मुस्लिमांचा हा भ्रम नाहीसा करण्यासाठी तीन-चार लेखांतून, मागला इतिहास सांगून टिळकांनी इंग्रजांना इशारा दिला की, ही चिथावणी शेवटीं तुमची तुम्हांलाच घातक होईल. आम्ही राज्य मुसलमानांपासून घेतलें, हा तुमचा दावा खोटा आहे. तुम्ही आला तेव्हा मराठ्यांनी मुस्लिम सत्ता जवळ जवळ नष्ट करीत आणली होती; आणि तुम्ही आला नसता तर, आज जीं काय एक-दोन मुस्लिम संस्थानें शिल्लक आहेत तींहि नाहीशी झाली असती. मुसलमानांनाहि टिळक सांगत की, मराठे, रजपूत, शीख