पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८] बांची प्रकृत हळू हळू सुधरत गेली. मग त्यांना घेऊन त्या बडोद्यास आल्या. एथें आल्यावर त्यांची प्रकृत बरीच चां- गली सुधरली. याचसाली दिवाळीच्या सुमारास जामात वाडीकर सरदेसाई बडोद्यास आले. त्यांना दिवाळीचा सण देऊन ताराबाबा व सरदेसाई यांची सांवतवाडीस रवानगी केली.ESH PRIOR पुढे काही दिवसांनी मासाहेबांची प्रकृत एकाएकी फारच बिघडकी. उन्हाळ्याचे दिवस असून हवापालट करण्यासाठी त्या नर्मदातटाक कर्नाळी येथे सन् १८९७ चे मे महिन्यांत जाऊन राहिल्या. त्याच मुक्कामी ताराबाबां- वर सांवतवाडी एथें मृत्युनें एकाएकी झडप घातल्याची दुष्ट तार आली. त्यांना कन्या वारल्याचे वर्तमान कळलें तेव्हां विषाने माखलेली तीक्ष्ण कट्यार जोराने छातीत खुपसल्यासारखी वेदना झाली. पोटांत चुन्याची भट्टी पे- टल्यासारखी आग भडकली. प्रिय कन्येवर मृत्यूचा घाला पडल्याची खबर कळताच त्यांचे पंचप्राण कासावीस झाले. शांति, समाधान व आनंद यांची अमृतवल्लि एकदम उप- टून टाकल्यासारखे झाले. ज्या झऱ्यांतून सुखाचा ओघ वाहत होता तो झरा एकाएकी अटून कोरडा ठणठणीत पडला. 'जैशी मृतवत्सका गाय, हंबरडा हाणोनि बोभाय । हृदय फुटोनि मोकली धाय, ह्मणे काय करूं आतां,' अशी त्यांची अवस्था झाली. त्या समयीं ताराबाबाचे वय सरा- सरी २५ वर्षांच्या आंतबाहेर होते. अशा अल्पवयात