पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/123

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते अनुदानित शिक्षणाने बऱ्यापैकी सिद्धही केलंय. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी शासन मान्यता घेणाऱ्या लीलाताईंनी अनुदान घेण्याचं ठरवून नाकारलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. माईसाहेब बावडेकरांनी पण प्रयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अनुदान न घेणं पसंत केलं होतं. ज्याला शिक्षण स्वायत्त हवं त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला हवं हे लीलाताईंनी कृतीनं दाखवून दिलं आहे.
 विहंगमावलोकन, सिंहावलोकन हा शिक्षणाच गाभा. मूल्यांकनात मूल्य शब्द आहे. मूल्य' (Value) ते शिक्षणात असल्याशिवाय ‘अंकन (Counting) अशक्य. मूल शाळेत गेल्यावर त्याला काय येऊ लागलं याची मोठी उत्सुकता पालकात असते. सामान्य पालक आपल्या पाल्यास पोपट, पपेटस् (Puppets) बनवू इच्छितात. त्यांना काय येतं हे ते त्यांच्या घोकमपट्टीवरून ठरवतात. लीलाताईंनी पोपट बनवण्यापेक्षा मुलांना गरुड बनवणं पसंत केलं. गरूड आपल्या पिलास एका मर्यादेपर्यंत भरवतो. मग देतो दरीत ढकलून. तुझं तू मिळव, तुझं तू शिक, तुझी तू शिकार कर. बाटलीने किती पाजायचं नि चमचा वाटीनं किती याचं भान ज्या आईला असतं तिची मुलं लवकर स्वावलंबी होतात. लीलाताई मुलांना स्वप्रज्ञ बनवायच्या मताच्या. पाजणं त्यांना मान्य नाही. पाझरण्यावर त्यांची भिस्त आहे. म्हणून मग त्या मुलांना जितक्या लहान वयात समजेल तितकी ती अधिक प्रगल्भ होतात, यावर लीलाताईंचा प्रगाढ विश्वास. शिक्षणात बुद्ध्यांकापेक्षा संवेदनासूचकांक महत्त्वाचा. तो पारंपरिक शिक्षणाने कधी विकसित केला नाही. म्हणून या देशात नागरिक घडले नाहीत. प्रेक्षक घडवले गेले. सर्जनात्मक शिक्षण आनंददायी असतं. म्हणजे केवळ रंजक असतं. नाही तर ते प्रबोधकही असतं. त्यातून सामाजिक संवेदनेचा, कृतिशील सहभागाचा वस्तुपाठ सृजन आनंदाने दिला. परिसरात काही घडो, त्यांची नोंद, जाणीव मुलांपर्यंत पोहोचवण्याची लीलाताईंची धडपड मी जवळून पाहिली आहे. प्रजासत्ताकाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी बालमनाची केलेली मशागत, तिचं ग्रंथरूप हे सर्व अभ्यासण्यासारखं तसंच अनुकरणीयही!

 शिक्षण म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणं हे एकदा सूत्र ठरलं की, वहिवाटीचा रस्ता सोडायचा. अभ्यासक्रमाची चौकट तर नाकारायची नाही पण पाठ्यपुस्तक अधिक आनंददायी करायचं. मग खेळ, भेंड्या, संग्रह, सर्वेक्षण, तक्ते, असा फेरावर फेर रुंदावत लीलाताईंचं शिक्षण ज्ञानकेंद्री न राहता कर्मकेंद्री होतं. शिक्षण म्हणजे श्रवण साधना नाही ते आस्वादन आहे. रस,ताल,संगीत,नाद, नृत्य, सान्यांचा फेर त्यात असेल तर शिकूनही बेकार राहण्याच्या

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२२