पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/139

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राध्यापकांचे कवचकुंडल : प्रा. संभाजी जाधव

 मी काही तुम्हास साताउत्तराची पुराणी कहाणी नाही सागं त... हा काळ अवघा पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. ध्येय वादाने स्थापन झालेल्या (एखादा सन्मान्य अपवाद वगळता) सर्व शिक्षण संस्था संस्थानिक झालेल्या... संस्थाचालकांचा शब्द हाच कायदा... त्यांच्या जीभेवर येईल तो पगार... त्यांच्या मनात असेल तोवर नोकरी... वेतनमान निश्चित झालं तरी मस्टरवर एक पगार... हाती कपात...३१ मार्चचा दिवस... (नंतर तो ३० एप्रिल झाला)... अशाश्वत सूर्य घेऊन उगवायचा... त्या दिवशी संस्थाचालक ज्यांची नावं वाचतील त्यांनीच पुढे येणाऱ्या जूनला कॉलेजात यायचं... प्राध्यापक संघटना झाली तरी प्राध्यापकांचे प्रतिनिधी संस्थाचालक, प्राचार्य ठरवत... पगाराचा दिवस म्हणजे कपिलाषष्ठीचा योग... आवई उठायची आज पगार होणार... मग कळायचं चेअरमन गावी गेलेत... मग चेक आला... आज बँक बंद... आज पाकिटं झाली नाहीत... आय. ए. एस. करणारे, डॉक्टर, इंजीनिअर, वकील, न्यायाधीश, पंतप्रधान राष्ट्रपतींना शिकविणारे प्राध्यापक मात्र दोन वेळच्या भाकरीला महाग... घर भाडं तटलेलं, दुधाचं बिल थकलेलं, किराणा उधार बंद... काल शंभरात मिळविणार प्राध्यापक आज लाखाची कमाई करतात. नोकरी अर्जाने, मुलाखतीने मिळते. पगार एक तारखेस. तोही चेकने व बँकेतून! पेन्शन-ग्रॅच्युइटी, एल. टी. सी., फेलोशिप, रिसर्च अँट, बुक अँट, संस्थेवर, विद्यापीठावर नुसतं प्रतिनिधित्वच नाही तर प्रभुत्व... अधिराज्यही! प्राध्यापक संघटनेने ठरवलं की सारी कॉलेजीस, विद्यापीठे एकमुखी बंद, परीक्षा रद्द... हे सारं घडलं एका माणसाच्या

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३८