पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/147

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पवित्रा घेतला. डी. बी. सरांचा यास विरोध होता. लढाईत आमची सरशी झाली. पण डी. बी. सरांनी रोजच्या व्यवहारात शिक्षक विरुद्ध मुख्याध्यापक असा पवित्रा येऊ दिला नाही. काळाची पावलं ओळखून वर्तमान स्वीकारण्याचा त्यांचा उदारपणा नि उमदेपणा यामुळे त्यांचा संघटक, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ नेहमी उजवा ठरत गेला. कोणत्याही चांगल्या उपक्रमामागे आपल्या संघटनेचे बळ उभारावयाच्या डी. बी. पाटील सरांच्या सकारात्मक वृत्तीमुळे ते अधिक मोठे वाटतात. ज्याला सत्ता हे सेवेचे साधन आहे हा विवेक जमला तो माणूस यशस्वी झाला असं समजा. सरांनी किती संस्था, संघटना, व्यक्ती, विचारांना अभय दिलं म्हणून सांगू? मी त्यांच्याबरोबर कितीतरी उपक्रमात भागिदारी केली. त्यांनी माझ्या अनेक उपक्रमात डोंगर उचलले. कोल्हापूरच्या बी. टी. कॉलेजच्या श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालय (एस. एम. टी टी.) सुवर्ण महोत्सव, महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, मराठी बालकुमार साहित्य सेंलन, बालक हक्क परिषद, शिक्षण व्यासपीठ ग्रंथमहोत्सव अशा अनेक उपक्रमांत मला त्यांचा निकटचा सहवास लाभला. त्यातून मला नियोजन, काटकसर, वक्तशीरपणा, नेटकेपणाचा संस्कार मिळाला.

 डी. बी. पाटील सर व्यक्ती म्हणनू अत्यतं मितभाषी. चर्चेच्या फापट पसाऱ्यात मुद्दे निवडण्याचं, टिपण्याचं कसब शिकावं तर सरांकडून. एखाद्या विषयावरची बैठक सुरू असते. कार्यकर्ते वेगवेगळी मत मांडत असतात. सर पॅड घेऊन त्यातलं मुद्याचं टिपण लिहून घेतात. परिषद, महोत्सव, चर्चासत्र समारंभाच्या चर्चेत त्यांना कामं दिसतात. माणसं दिसली की त्यांचे गुण दिसतात. त्यांच्या दोषाचं त्यांना भान असतं. त्या दोषावर उतारा म्हणून दुसरा एक माणूस ते दोष नियंत्रक म्हणून नेमतात. माणसांना कामातलं नेमकेपण समजावून देतात. कामाचं बजेट सांगायला सर कधी विसरत नाही. कामाची जबाबदारी सोपवून ते घरी झोपत नाहीत. कोणत्या कामात कधी गोंधळ होण्याची शक्यता आहे हे त्यांनी आधीच हेरलेलं असतं. त्या वेळी ते दत्त म्हणून उभे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आपत्ती व्यवस्थापनाचं एक होकायंत्र (खरं तर होरायंत्र) सतत चक्राकार फिरत असत. त्यांना कामचुकाराचं भान असतं. ते अशा माणसास न दुखावता गाळतात. ते अधिक साथर्क, समर्थ पयार्य देऊन. ‘तुमच्याबरोबर त्यांना जरा घ्या' असं डी. बी. सर जेव्हा सांगतात तेव्हा सुजाण कार्यकर्ता आपला पत्ता साफ झाला, पतंग कटला ओळखून आपसूक दुरुस्त होतो. सराची दुरुस्ती परीक्षा Indirect असते. कामात भिडेपोटी कसर ते कधी स्वीकारत नाहीत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४६