पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/98

हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांच्यात एक मनुष्यपारखी निरीक्षकही दडलेला आहे. आलेला मनुष्य का, कशासाठी आला, त्यांना कसे हाताळायचे याचं एक विलक्षण चाणाक्षपण त्यांच्यात मी अनुभवलं. ते मोठे आतिथ्यशील. घरी गेल्यावर कोणी चहापानाशिवाय जाऊच शकणार नाही. सही घ्यायला आलेल्या शिपायाचीपण मग यातून सुटका असत नाही. 'किरी कुंजर समान' (मुंगी-हत्ती) अशी त्यांची उदारता केवळ अनुकरणीय!
 ते अंकलीच्या शितोळ्यांचे वंशज, शितोळे घराण्यास शिवकालीन प्रतिष्ठा आहे. मंत्री, पुरंदरे परिवाराशी त्यांचे नाते संबंधही. पंढरपूरच्या विठोबाच्या पालखीतील पादुकांचे ते मानकरी. ते मोठे विठ्ठलभक्त. अंघोळ झाली की स्वतः बुक्का लावणार व उपस्थित इतरांनाही. त्यात प्रदर्शनापेक्षा भक्तिभाव मोठा असतो. माझ्यासारख्या नास्तिकासही ते तो लावतात, आपल्या मनाची सचोटी म्हणून.

 व्यक्तिगत जीवन व सामाजिक चेहरा अशी त्यांनी फारकत करून कुणाची फसगत केल्याचा इतिहास नाही. सारस्वत बोर्डिंगचा त्यांनी केलेला ‘कायाकल्प' हा त्यांच्या समाजकार्याचा कळस होय. छत्रपती शाहू महाराजांनी हे बोर्डिंग तत्कालीन सारस्वत अल्पसंख्यांकासाठी सुरू केलेले काळाबरोबर आपण बदलले पाहिजे अशी धारणा असलेल्या कामतसाहेबांनी सारस्वत बोर्डिंग सर्व जाति-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुले केले. एक धार्मिक मनुष्य समाजजीवनात मात्र धर्मनिरपेक्ष कार्य करतो हे केवळ व्यक्तीविकास नसून वैचारिक प्रगल्भतेचे व भविष्यवेधी चिंतनाचेच गमक होय. सारस्वत बोर्डिंग त्यांच्या धडपडीतून आथिर्क दृष्ट्या संपन्न व स्वावलंबी झाले. त्यांनी आपल्याकडे होणा-या धनसंचयाचा लाभ अनाथ, अंध, अपंग, मतिमंद संस्थांतील सर्वथा वंचितांच्य कल्याणासाठी करून दिला. के. डी. कामत व्यवसायानचे बाधं काम करणारे ठेकेदार नव्हते. तर नव्या समाजरचना व धारणेचा त्यांनी पकडलेला ठेका, त्यातील तान, ताल व सुरातील फेक दर्दी समाज हितैषीच जाणतील. त्यांच्या त्या उदार समाजसेवकास ‘सारस्वत रत्न' सारखी पदवीच शोभून दिसते.
 कामतसाहेबांनी ज्या संस्थांची धुरा सांभाळली त्यांची आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहील याची त्यांनी नियोजनपूर्वक आखणी केली. सारस्वत बोर्डिंगप्रमाणेच अंकलीचे हायस्कूल, कौन्सिल आफैं ज्युकेशनसारखी संस्था सर्वांची आथिर्क बांधणी त्यांनी आपल्या पूर्ण कौशल्याने केली. कै. दे. भ. रत्नाप्पा कुंभार, करुणाकल्पतरु शां. कृ. पंत वालावलकर, धर्मानुरागी आर. जे. शहा हे त्यांच्या शैक्षणिक कार्यातील सहकारी.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९७