३
स आपल्या बाललीलेकरून (चमत्कृति आचरणाच्या
द्वारे) संतुष्ट करून सोडण्याची कमाल केली होती !!
ती ज्या वेळी आपल्या समंजसपणांत आली त्यावेळीं
ती नित्यशहा स्वगृहशोभा करणें; देवगृहीं नाना प
. त्रादिकांचीं तोरणे लावणें, गुडिया उभारणें, कुशलतेचे
भावदर्शक चित्रविचित्र रंगवल्लिका आंखणें, स्वस्तिकें,
शंख, चक्र, गदा, पद्मादिक आयुर्वे सादृश्यते परिरे-
स्वर्णे, विकसित सुपुष्पांच्या माळा, गजरे, तुरे करून
देव ब्राह्मणास अर्पण करणे, स्वतः नानापरिमल द्र-
व्याच्या सिद्धतेनें देवतार्चन करून दृढ मानस भक्तींत.
रंगली जाणें, इत्यादी सत्कृत्यांत सदैव गुंतलेली असे !
सारांश तो बाल्यदशेतच सदाचरणप्रवृत्त अशी
बनली होती, व त्या वरून ती मुकुलजा ह्या नाम-
ष्टत्वास योग्य अशी होऊन त्या काळचे सर्व लोक
ते तिचे सगुण पाहून फार थक्क होत !! मग ज्यांच्या
पोटीं तिर्चे जन्म झालें होतें त्या मातापितरांस किती
आश्चर्य व समाधान वाटले असेल हें येथें निराळे सां-
गर्णे नको !!!
या संसारांत मनुष्यमात्रांस खरें सुख प्राप्त होण्या-
स द्रव्य हैं एक मोठें साधन आहे; परंतु ते प्राप्त अ-
सतां ही घरांत जर पतिव्रता मनोविहारणी स्त्री,
कुलावतंसपुत्र अथवा कन्या हीं नसली तर त्या द्र-
व्यापासून व्हावे तसें सुख मिळत नाहीं ! राज्यपद
कां प्राप्त होईना पण ह्या दोन गोष्टीची उणीव असतां
त्या वैभवापासून कांहींच सुख व्हावयाचें नाहीं. ! !.
सारांश श्रीमंती नसली तरी चालेल, पण घरांत सुगृ-