पान:खानदेश मित्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुबोधकथामाला.

हिणी आणि आनंदजनक संतति ही अगत्य असावी ! सुमंतु विप्र हा घरचा दरिद्रीच होता. पण ह्या वरील दोन गोष्टीची पूर्ण साह्यता त्यास होती म्हणून तो आपणास इंद्रापेक्षांही धन्य आणि सुखी मानी ! ! व सदैव समाधान वृत्तीत राहून ईश्वराचे आभार मानीत असे ! ! परंतु या मृत्युलोकची वस्ति अचिरायूच ! ! येथें अखंड सुखसमाधान कोण पावला ! ! ! तो सु- मंतु विप्र वर सांगितल्या प्रमाण मोठ्या आनंदाने नां- दत असतां त्यास पुढें तो असलेली सर्व सिद्धता फार दिवस लाभली नाहीं, ह्यणजे त्याला पूर्वपुण्ये करूनच जशी दीक्षा ही सुगृहिणी प्राप्त झाली होती तशी ती पुण्याई सरतांच ती अकस्मात् त्याचा निरोप घेऊन एकाएकों परलोकास निघून गेली ! ! गृहकृत्य चा- लविण्यास घरांत दुसरे कोणी नसून भार्या फार सु- शील, आणि पातिव्रत्यसंरक्षणपटु अशी होती ह्मणून दिक्षेच्या मरणापासून त्या सुमंतु विप्रास फा- रच शोक ओढवला. परंतु शेवटी दैवगति बलवत्तर असते या वचनावर समाधान करून घेऊन तो कां- ही दिवस पर्यंत तसाच निवांत राहिला. सुशीला ही अल्पवयस्क असून फार सुलक्षण असल्यामुळे सुमंतु विप्र स्त्री मेल्या पाठीमागे तिचें फारच ममतेने लालन पालन करी, व हिला कसेंही करून आईचा विशेष आठव न होईल अशास्तव तो सदैव जपत असे. गृहसंबंधी सर्व कृत्य त्यानेच करून सुशिलेस किंचितही त्या- बद्दल तसदी होऊं देऊ नये, पण तशाने त्याच्या नित्य सदाचरणास मात्र आडफांटा बसण्याची पाळी